pickles  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: चटकदार लोणचं चवीने खाताय तर थांबा! या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना

लोणचे जास्त खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

Aishwarya Musale

जेवण करत असताना आपल्या ताटात लोणचं असतंच. याच कारण म्हणजे त्याच्याशिवाय जेवण जातंच नाही. पण, सतत लोणचे खात असाल तर काळजी घ्या कारण ते अनेक रोगांचे घर असू शकते. कळत-नकळत अनेकजण लोणचे खाऊन आपल्या आरोग्याशी खेळत असतात.

जेवणासोबत लोणचे खाल्ल्याने कोणत्याही साध्या अन्नाची चव वाढते हेही खरे आहे. पण लोणचे जास्त खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्याचबरोबर अनेक आजारांना आमंत्रण देणारे आहे.

लोणचे खाण्यास का मनाई आहे?

लोणचे जास्त प्रमाणात खाण्यास मनाई आहे कारण ते बनवताना त्यात मोठ्या प्रमाणात मीठ वापरले जाते. त्यामुळे तुमच्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला वॉटर रिटेंशन, पोट फुगणे, उच्च रक्तदाब आणि किडनीच्या आजाराशी संबंधित समस्या असू शकतात. लोणच्यामध्ये असलेले सोडियम तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी करू शकते.

कोलेस्टेरॉलची समस्या

जास्त लोणचे खाणाऱ्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असते. त्यामुळे लोणचे जास्त खाणे टाळावे. लोणचे दीर्घकाळ साठवले जाते. ज्यामध्ये भरपूर तेल वापरले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जास्त तेल खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढते.

उच्च रक्तदाब

बीपीच्या रुग्णांसाठी लोणचे खाणे विषापेक्षा कमी नाही. लोणच्यामध्ये असलेले मीठ बीपीच्या रुग्णाच्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.

सूज येऊ शकते

लोणचे जास्त खाल्ल्यानेही शरीरात सूज येऊ शकते. कारण लोणचे जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यात मीठ आणि तेल मिसळून ते जास्त काळ ठेवतात. खूप लोणचे खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या देखील होऊ शकते आणि चयापचय आणि यूरिक ऍसिडच्या समस्या देखील वाढू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT