लाइफस्टाइल

Health Care News : मनगट सतत दुखते का? मग या आसनांमुळे मिळेल आराम

मनगट सतत दुखते का? मग नियमित करा ‘ही’ तीन योगासने

Aishwarya Musale

लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने अनेकदा मनगटात वेदना होतात. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र होते की कामातही व्यत्यय येतो. लोक त्यामुळे औषधे देखील खातात. तुमचंही सतत मनगटात दुखत असेल तर या आसनांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.

गोमुखासन

हे आसन केल्याने खांदे आणि मनगटाच्या बाहेरील बाजू ताणल्या जातात, यामुळे मनगटातील वेदनांपासून आराम मिळतो. यामुळे मनगट मजबूत होते आणि लवचिकता वाढते.

गोमुखासन कसे करावे?

  • टाच आणि पायाची बोटे जोडून दोन्ही पाय तुमच्या समोर सरळ ठेवून बसा. कमरेला लागून हात आणि तळवे जमिनीवर विसावलेले ठेवा.

  • नजर समोर ठेवा. डावा पाय वाकवा आणि टाच उजव्या नितंबाजवळ ठेवा. उजवा पाय वाकलेला ठेवा.

  • या स्थितीत दोन्ही मांड्या एकमेकांच्या वर ठेवल्या जातील जे त्रिकोणासारखे दिसतील.

  • श्वास घेताना उजवा हात वर उचला आणि उजवा खांदा वर खेचा आणि हात पाठीमागे वळवा.

  • नंतर डावा हात पाठीमागून पोटाजवळ धरा आणि उजव्या हाताची बोटे धरा. मान आणि कंबर सरळ ठेवा.

  • आता एका बाजूने साधारण एक मिनिट केल्यानंतर तेच दुसऱ्या बाजूने करा. जोपर्यंत सोयीस्कर आहे तोपर्यंत या स्थितीत रहा.

अधोमुख स्वानासन कसे करावे?

  • योगा मॅटवर पोटावर झोपा. यानंतर श्वास घेताना शरीर आपल्या पायांवर आणि हातांवर उचलून टेबलसारखा आकार तयार करा.

  • श्वास सोडताना, हळू हळू नितंब वरच्या दिशेने वाढवा.आपले कोपर आणि गुडघे ताठ ठेवा. शरीर उलट्या 'V' आकारात असेल याची खात्री करा.

  • या आसनाचा सराव करताना खांदे आणि हात सरळ रेषेत राहिले पाहिजेत. तर पाय नितंबांच्या रेषेत राहतील. लक्षात ठेवा की तुमचे घोटे बाहेरील बाजूस असतील.

  • आता हात जमिनीच्या दिशेने खाली दाबा आणि मान ताणण्याचा प्रयत्न करा. तुमचे कान तुमच्या हाताच्या आतील भागाला स्पर्श करत ठेवा आणि तुमची नजर नाभीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

  • काही सेकंद या स्थितीत राहा.

या व्यायामामुळे देखील वेदना दूर होतील

  • मनगटातील वेदना कमी करण्यासाठी, आपले हात पुढे करा.

  • आता मनगट खाली वाकवा.

  • दुसऱ्या हाताने मनगट खाली खेचण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीत तुम्हाला ताण जाणवेल.

  • आपले मनगट सुमारे 30 सेकंद असेच ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT