yoga sakal
लाइफस्टाइल

International Yoga Day 2024: योगासने करण्याआधी अन् नंतर किती प्रमाणात पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो.

Aishwarya Musale

लोकांना योगाचे महत्त्व किंवा योगा करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आज केवळ भारतीयच नाही तर जगभरातील बहुतांश लोक योगासने आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवत आहेत.

योग एक अशी क्रिया आहे जी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करते. आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 21 जून हा आज योग दिनामुळे चर्चेत असला तरी हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणूनही ओळखला जातो.

या दिवशी खूप गर्मी असते, त्यामुळे योग करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला आज योगासने करताना पाणी कसे प्यावे हे सांगणार आहोत. तसेच, लोक पाण्याशी संबंधित कोणत्या चुका करतात हे सांगणार आहोत.

योग करताना असे पाणी प्या

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया करतो तेव्हा आपल्याला तहान लागते. लोकांमध्ये असा समज आहे की या दरम्यान पाणी पिल्याने आरोग्य बिघडू शकते, परंतु तसे नाही. तुम्ही योगा करत असाल तर मध्येच सिप-सिप करून पाणी प्या. असे केल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि एनर्जी देखील टिकून राहते.

योग किंवा व्यायाम करताना पाणी पिण्याशी संबंधित चुका

योग करताना बहुतेक लोक पाण्याला हातही लावत नाहीत. तुमच्या शरीरानुसार तुम्ही ही टीप फॉलो करा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर तुम्ही जूनच्या गर्मीत योग करत असाल तर त्या दरम्यान पाणी प्या.

योग करताना लोक थंड पाणी पितात असेही दिसून आले आहे. थंड पाण्याने आराम मिळत असला तरी त्याचा हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. साधे पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

योगासने केल्यानंतर लगेच पाणी पिणे ही चूक आहे. योगासने किंवा व्यायाम केल्यानंतर शरीर तापते आणि हृदयाची गतीही वाढते. अशा स्थितीत पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका देखील सहन करावा लागू शकतो.

नॉर्मल पाण्यात मिसळलेले थंड पाणी पिणे देखील आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्याऐवजी, तुम्ही मडक्याचे पाणी पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''परळीतल्या गल्लीबोळातला स्टार प्रचारक...'', देशमुखांची धनंजय मुंडेंवर सडकून टीका

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

Viral Video: चार वर्षांच्या बालिकेला सेविकेची मारहाण, जमिनीवर आपटले अन्... व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

टीव्हीवरचे बहिण-भाऊ खऱ्या आयुष्यात झाले नवरा बायको! मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो चर्चेत

Kolhapur Crime : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; कात्यायनी मंदिर परिसरात उसाच्या शेतात नेऊन...

SCROLL FOR NEXT