Health Tips esakal
लाइफस्टाइल

Health Tips : आरोग्यासाठी दूध चांगलं पण ते कशासोबतही खाऊ नका, दूध आवडतं तर हे नियमही जाणून घ्या

दूधासोबत ही फळे खाऊ नका

Pooja Karande-Kadam

 Health Tips : दूध पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे बहुतेकांना माहीत असेल. दुधामुळे पोट तर भरतेच पण त्याचबरोबर शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक तत्व मिळणे सोपे जाते. बरेच लोक दुधापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. 

तर काही लोक ते चुकीच्या गोष्टींनी पितात. दुधामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात, परंतु जर तुम्ही चुकीच्या अन्नपदार्थांसह त्याचे सेवन केले तर त्याचे नुकसानही दिसून येते.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दूध पिणे चांगले मानले जाते. यामुळे आपल्याला कॅल्शियम मिळते, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात आणि शरीराला ताकद मिळते. तुम्ही दूध गरम किंवा थंड पिऊ शकता, दोन्ही परिस्थितीत ते शरीराला खूप फायदे देते. 

मात्र, काही गोष्टी चुकूनही दुधासोबत खाऊ नयेत. नाहीतर पचनक्रिया बिघडायला वेळ लागणार नाही. केवळ पचन क्रीयाच नव्हे तर शरीरातील इतर अवयवांनाही त्याचा फटका बसतो. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचे सेवन दुधासोबत करू नये. 

दुधासोबत खाऊ नये अशा गोष्टी 

टोमॅटोसोबत दूध पिऊ नका

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते टोमॅटोचे सेवन दुधासोबत कधीही करू नये. याचे कारण टोमॅटो आम्लयुक्त आहे. अशा परिस्थितीत, दुधासह टोमॅटो खाल्ल्यास तुमच्या शरीराची प्रतिक्रिया होऊ शकते, ज्यामुळे उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. 

दूध कधीही मसालेदार पदार्थासोबत पिऊ नये. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. हे मिश्रण हार्मोन्ससाठी चांगले मानले जात नाही. असे केल्याने तुम्हाला अपचन, छातीत जळजळ इत्यादी समस्या होऊ शकतात.  

लोणच्यासोबत दूध पिऊ नये

जेव्हा तुम्ही लोणच्यासोबत पोळी किंवा भात खात असाल तेव्हा दूध पिऊ नये. लोणचे आणि दूध यांचा छत्तीसचा आकडा आहे. असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि तुम्ही अनेक दिवस अंथरुणाला खिळून राहू शकता.

 

फळे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नका

दही, लस्सी किंवा केळी वगळता इतर कोणतेही फळ जसे आंबट खाताना दूध पिऊ नये. असे केल्याने पचनक्रिया बिघडते आणि उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो. त्यामुळे या गोष्टी न वापरल्यास बरे होईल. 

दूध आणि प्रथिने

असे मानले जाते की दूध आणि प्रथिने कधीही एकत्र घेऊ नयेत. कारण यामुळे तुमचे पोट जड होऊ शकते आणि वजन वाढू शकते. प्रथिनयुक्त अन्न आणि दूध एकत्र घेतल्यास शरीरात जडपणा येतो आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पण ज्यांना म्हातारपणात स्नायू मजबूत करायचे आहेत अशा लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो.  

दूध आणि मांसाहार

दुधासोबत मासे खाणे देखील विशेषतः टाळावे. कारण मांस आणि मासे हे निसर्गात उष्ण असतात. तर दुधाचा स्वभाव थंड असतो. जेव्हा आपण हे दोन्ही एकत्र सेवन करतो, तेव्हा शरीरात रासायनिक असंतुलन निर्माण होऊ शकते.

ज्यामुळे आरोग्य बिघडते. एका न्यूट्रिशनिस्टने सांगितले की, दोन प्रोटीनयुक्त पदार्थ एकत्र खाणे टाळावे. दुधातही प्रथिने भरपूर असल्याने दुधासोबत मासे आणि मांस खाऊ नये.

दूधासोबत ही फळे खाऊ नका

दुधात फळे मिसळून रस बनवण्याची पद्धत फार जुनी आहे. मात्र, सर्व प्रकारची फळे दुधात मिसळू नयेत, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण शेक आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. दूध हे प्राणी प्रथिन आहे.

त्यामुळे काही फळांमध्ये ते मिसळल्याने पचनाच्या समस्या आणि अॅसिडिटी होऊ शकते. केळी आणि दूध हे देखील चांगले मिश्रण नाही कारण ते खोकला आणि सर्दी होऊ शकतात. दुधासोबत घ्यावयाची सुरक्षित फळे म्हणजे आंबा, खजूर, एवोकॅडो आणि अंजीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT