Sleeping After Eating sakal
लाइफस्टाइल

Health Tips: सावधान! जेवणानंतर लगेचच या गोष्टी करणं ठरू शकतात जीवघेण्या

Sleeping After Eating: ज्याप्रमाणे आपण सर्व जण जेवण करताना काही गोष्टींची काळजी घेतो, त्याचप्रमाणे जेवणानंतर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

सकाळ डिजिटल टीम

Sleeping After Eating: अन्न खाल्ल्यानंतर अनेक लोकांना काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. तसेच काही लोकांना जेवण करताच भयंकर आळस येतो आणि झोप येते. पण तुम्हाला माहित आहे का अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जेवणानंतर करू नयेत.

आपण सर्व जण ज्याप्रमाणे जेवण करताना काही गोष्टींची काळजी घेतो, तसेच जेवणानंतर काही गोष्टींची काळजी देखील घ्यावी लागते. कारण या सगळ्या सवयी तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत की तुम्ही दिवस-रात्र जेवणानंतर काय करू नये.

जेवल्यानंतर या सवयी नक्की सोडा…

जेवल्यानंतर लगेच झोपू नका : अनेकजणांना जेवण करताच झोपावेसे वाटते. ते जर घरी असतील तर जेवण केल्यानंतर लगेच झोपतात. रात्रीचे जेवण असो किवा दुपारचे जेवण, जेवणानंतर तुम्ही लगेच झोपणे टाळावे. जेवणानंतर लगेच झोपल्याने पचनक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे अन्न नीट पचत नाही.

जेवल्यानंतर आंघोळ करू नका : तुम्ही जर रात्रीचे जेवण केले असेल तर लगेच आंघोळ करणे टाळा. अन्न खाण्याची आणि आंघोळ करण्याची काही लोकांना सवय असते. मात्र, ही वाईट सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. आंघोळीमुळे पोटाभोवतीच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

जेवल्यानंतर फळे खाऊ नका : आपल्यासाठी फळे खूप फायदेशीर आहेत. फळे खाण्याची पण एक वेळ असते. जेवणानंतर लगेच फळ खाल्ले तर ते तुमचे नुकसान करू शकते. तुम्हाला जर फळे खायची असतील तर खाण्याच्या 3 तास आधी किंवा नंतर खा.

जेवल्यानंतर नशा टाळा : काही लोक जेवल्यानंतर धूम्रपान करतात. ही सवय त्यांना जबरदस्तीने लावली जाते. तुम्हीही असं करत असाल तर लगेच थांबा. कारण जेवल्यानंतर लगेच धूम्रपान किंवा नशा केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT