Dental Health Tips  esakal
लाइफस्टाइल

Dental Health Tips : आता स्माईल करा मोठी; या घरगुती उपायांनी करा दातांवरील किडीची सुट्टी

लिंबू, लवंग असे अनेक पदार्थ तुमचे दात स्वच्छ ठेवतील

Pooja Karande-Kadam

Health Tips : स्वच्छ सुंदर दात केवळ तुमचं सौंदर्यंच वाढवत नाहीत. तर, तुमच्या स्माईललाही मोठं बनवतात. पांढरेशुभ्र दात आपले व्यक्तिमत्त्वही सुधारतात. पण दातांमध्ये लागलेली किड एकदा लागली की बाहेर पडण्याचं नावंच घेत नाही.

हि किड दात पोखरून टाकते आणि दातातून कळा यायला लागतात. तेव्हा आपल्याला परिस्थितीचे गांभिर्य कळते. किडल्यामुळे ते दात पोकळ होऊ लागतात. खरं तर, पोकळी होण्याची अनेक कारणे असू शकतात. दात स्वच्छ नसणे, तोंडात बॅक्टेरियाचा संसर्ग, गोड पदार्थांचे जास्त सेवन किंवा आरोग्याची कोणतीही समस्या.

दातात निर्माण झालेली पोकळी, किड दात खराब करण्याचे काम करू शकतात. चला तर मग आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगतो ज्यामुळे या समस्येपासून सुटका होऊ शकते.

दातांची किड दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा

लवंग

भारतीय स्वयंपाकघरात लवंग असतेच. लवंग हा खड्या मसाल्यातील एक मसाला आहे. त्याचा वास उग्र असतो ज्यामुळे ती अखंडच वापरली तरी तिचा स्वाद घरभर पसरतो. लवंग आपल्याला केवळ दातांची किड नाही तर अनेक प्रकारच्या तोंडी समस्येशी लढण्यास मदत करते.

याचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आपल्याला वेदना कमी करण्यास देखील मदत करतात. लवंगाच्या तेलाचा वापर करून दातांच्या कृमींपासून आराम मिळू शकतो.

लसूण

लसणाशिवाय कोणतीही फोडणी अपूर्ण तसेच आरोग्यही. भारतीय स्वयंपाकघरात असलेला लसूण केवळ जेवणातील चव वाढवण्याचे काम करत नाही. तर आरोग्यासाठी ही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लसूणमध्ये असलेले अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म हे एक उत्तम वेदनाशामक बनवतात, ज्यामुळे दातदुखी आणि किडीपासून मुक्ती मिळू शकते.

लसणाशिवाय कोणतीही फोडणी अपूर्ण तसेच आरोग्यही

मिठाचं पाणी

दाताला लागलेली किड आणि दुखण्यामध्ये मिठाच्या पाण्याचा खूप उपयोग होऊ शकतो. हे आपले तोंड बॅक्टेरियापासून मुक्त ठेवते आणि पोकळीतील चिकटपणा देखील काढून टाकते. मीठ पाणी आपल्या तोंडातून आम्ल काढून तोंडाची पीएच पातळी सामान्य करू शकते. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करून तुम्ही किडलेल्या दातांना बरे करू शकता.

लिंबू

लिंबू व्हिटॅमिन-सीने भरलेला असतो. यात असलेले ऍसिड जंतू नष्ट करून वेदना कमी करण्यास मदत करतात. लिंबाचा तुकडा तोंडात घालून चावून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे दातातील वेदना कमी होतात. अन् किडलेल्या दातांपासूनही आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT