Healthy Breakfast  esakal
लाइफस्टाइल

Healthy Breakfast : नाश्त्यासाठी याहून पौष्टीक पदार्थ शोधूनही सापडणार नाही, ज्वारीच्या पिठाचा असा करा वापर

किमान सकाळचा नाश्ता या भाकरीपासून बनलेला अन् पौष्टीक असेल तर सोन्याहून पिवळं होईल

सकाळ डिजिटल टीम

Healthy Breakfast :

नाश्त्याला तळलेले पदार्थ सतत खाणाऱ्या लोकांमध्ये अनेक आजार वाढलेले दिसतात. तेलाने वजन तर वाढतेच पण त्यामुळे अनेक व्याधीही सुरू होतात. अशावेळी तुम्ही नाश्त्यासाठी काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा. ज्यामुळे तुमचे आरोग्य अबाधित राहील.

आजकाल हेल्दी पदार्थांच्या नावाखाली अनेक पदार्थ खपवले जातात. पण तुम्ही त्या सगळ्यांपासून दूर राहून ज्वारीचा आहारात समावेश करायला हवा. जितक्या आवडीने लोक हॉटेलमध्ये मैद्यापासून बनलेल्या रोट्या खातात. तितक्या आवडीने ते भाकरी खात नाहीत. त्यामुळेच किमान सकाळचा नाश्ता या भाकरीपासून बनलेला अन् पौष्टीक असेल तर सोन्याहून पिवळं होईल.

त्यामुळेच आम्ही तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून एक पौष्टीक अन् सकस नाश्ता कसा बनवायचा ते सांगणार आहोत. आजवर तुम्ही बेसनाचे धिरडे खाल्ले असतील. पण ज्वारीपासून कुरकुरीत असे धिरडे बनतात अन् ते पचनासही उत्तम असतात. त्यामुळे, ज्वारीचे धिरडे कसे बनवायचे हे पाहुयात.  

ज्वारी खाण्याचे फायदे

  • ज्वारी पचायला हलकी असते. त्यामुळे नाश्ता, जेवणात ज्वारीचा समावेश करावा

  • ज्वारी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते

  • १ कप ज्वारीमध्ये २२ ग्राम एवढे प्रोटीन असतात. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते

  • ज्वारी खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते

ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठीचे साहीत्य

  1. ज्वारीच पीठ १ कप

  2. पाव कप तांदळाचे पीठ

  3. लाल तिखट

  4. धने पुड

  5. धने जीरे

  6. बारीक चिरलेली ढोबळी मिरची

  7. बारीक चिरलेला टोमॅटो

  8. हळद

  9. किसलेले गाजर

  10. बारीक चिरलेली कोथंबीर

  11. मीठ

  12. आवश्यकतेनूसार पाणी

  13. लिंबू रस

कृती

  • ज्वारी आणि तांदळाचे पीठ मिक्स करून घ्या. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून धिरड्यांसाठी लागणारे पातळ पीठ बनवून घ्या

  • आता या पिठात सर्व मसाले आणि भाज्या घालून घ्या

  • सर्वात शेवटी कोथंबिर आणि लिंबाचा रस घालावा

  • आता आंबोळीच्या तव्यामध्ये तेल सोडून घ्या. त्यावर धिरड्यांचे पीठ घालून जितके पातळ हवे त्यानुसार पसरवून घ्या

  • त्यानंतर बारीक फ्लेम करून मग त्यावर झाकण ठेवावे

  • थोड्यावेळाने झाकण काढून त्यावर तेल सोडावे आणि पुन्हा झाकावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT