फिटनेस फ्रिक अनेक जण सध्या दूध व दुग्धजन्य पदार्थांऐवजी सोया मिल्कला विशेष पसंती देत आहेत. सोया मिल्कमध्ये कॅलरजचं प्रमाण कमी असून कार्ब्स, प्रोटीन, सोडिअम, कॅल्शिअम याचं प्रमाण जास्त असतं. तसंच लॅक्टोज इंटॉलरेंसची समस्या असलेल्या व्यक्ती सोया मिल्कचं सेवन करु शकतात. या मिल्कमुळे डायबिटीज,कार्डियो, लठ्ठपणा या समस्या दूर करण्यास मदत मिळते. म्हणूनच, सोया मिल्क पिण्याचे फायदे कोणते पाहुयात. (healthy drink health benefits of soy milk)
१. हायपर टेन्शन -
नियमितपणे सोया मिल्कचं सेवन केल्यास हायपर टेन्शनचा त्रास कमी होतो. सोया मिल्कमध्ये फ्लेवेनॉइड्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. विशेष म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहिल्यामुळे हायपर टेन्शची समस्यादेखील दूर राहते.
२. टाईप -२ मधुमेह -
ज्या व्यक्तींना टाईप -२ चा मधुमेह आहे त्यांनी सोया मिल्कचं सेवन केलं पाहिजे. सोया मिल्क हे डेअरी प्रोडक्ट नसल्यामुळे त्याच्या सेवनामुळे कोणतीही समस्या निर्माण होत नाही. या दुधात कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं. सोबतच फॅट्सदेखील कमी असतात.
३. वजन नियंत्रणात राहतं -
सोया मिल्क एलडीएल कोलॅस्ट्रॉलचं प्रमाण कमी करते. तसंच यात फॅट्स कमी असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. सोया मिल्कचं सेवन केल्यामुळे भूकदेखील लवकर लागत नाही.
४. त्वचेशी निगडीत समस्या दूर -
सोया मिल्कमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्वचेशी निगडीत समस्याही दूर होतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, सुरकुत्या पडणे या समस्या दूर होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.