health sakal
लाइफस्टाइल

Women Health : 45 व्या वर्षानंतर महिलांमध्ये अचानक वाढतो हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या काय आहेत कारणं?

45 व्या वर्षानंतर महिलांमध्ये अचानक वाढतो हृदयविकाराचा धोका.. जाणून घ्या

Aishwarya Musale

हृदयरोग ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. दरवर्षी जगभरात लाखो लोकांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमवावा लागत आहे. हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकार आणि हार्ट अटॅकचाचा धोका कमी असला तरी वाढत्या वयासोबत हा धोका वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अभ्यासात असे आढळून आले आहे की 40 वर्षांखालील महिलांना हृदयविकार होण्याचा धोका पुरुषांपेक्षा कमी असतो, परंतु हा धोका काही वर्षांत अचानक वाढू शकतो. जेव्हा तुमचे वय ४५-५० होते, तुम्हाला हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर परिस्थितींचा धोका जास्त असू शकतो. पण असे का होते? आम्ही तुम्हाला सांगतो.

महिलांमध्ये हृदयविकाराची समस्या

हृदयविकाराच्या स्थितीचा पुरुष आणि स्त्रियांवर कसा परिणाम होतो हे शोधण्यासाठी केलेल्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. जसजसे वय वाढत जाते, विशेषत: 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना, हृदयविकाराचा अधिक धोका असतो.

यासाठी रजोनिवृत्ती हा मुख्य घटक मानला जातो, म्हणजे ज्या वयात मासिक पाळी थांबते. रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात अनेक रासायनिक आणि हार्मोनल बदल होऊ लागतात, ज्यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराच्या गंभीर समस्या वाढतात.

रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी बदलते. या बदलामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. जर तुम्हालाही या विषयाची माहिती नसेल तर तुमच्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

इस्ट्रोजेन का आहे महत्वाचे?

इस्ट्रोजेन हार्मोन महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. इस्ट्रोजेन हार्मोन निरोगी रक्तवाहिन्या आणि कोलेस्टेरॉलची पातळी मेंटेन ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच रजोनिवृत्तीनंतर महिलांचे वजन आणि रक्तदाबही वाढू लागतो. हे सर्व हृदयविकाराला प्रोत्साहन देतात.

रक्तदाब नियंत्रित करा

रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास इस्ट्रोजेन मदत करते. रजोनिवृत्तीनंतर, कमी इस्ट्रोजेन पातळीमुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाचा थेट परिणाम हृदयावर होतो.

निरोगी जीवनशैली फॉलो करा

फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीन असलेले संतुलित आहार घेतल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. धूम्रपानासारख्या सवयी हे हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan : रिषभ पंतमुळे भारत अ संघात सर्फराजची निवड झाली नाही; युवा फलंदाजाला संघात स्थान मिळण्यासाठी दिला गेलाय सल्ला...

Kolhapur Tragic Diwali : दुर्दैवी! ऐन दिवाळीत अपघातांची मालिकाच, कोल्हापुरात एका दिवसात ४ जणांचा अपघाती मृत्यू

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची केली तोडफोड

Pune Air Pollution : पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षी पेक्षा प्रदूषण कमी, हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

SCROLL FOR NEXT