Eggs  sakal
लाइफस्टाइल

Bad Food Combination: अंड्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; आरोग्यावर होईल वाईट परिणाम

अंड्यांसोबत चुकूनही ‘हे’ काही ठराविक पदार्थ एकत्रित खाऊ नका.

Aishwarya Musale

कोंबडीचे अंडे हे प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जाते. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आढळतात, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते. यामुळेच छोट्या मुलांना किंवा खेळाडूंना अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. हे सर्व अंड्याचे सेवन करण्याच्या फायद्यांबद्दल आहे.

परंतु तुम्हाला माहित आहे का की कधीकधी अंड्याचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरते. अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन कधीही अंड्यासोबत करू नये, अन्यथा गंभीर आजारी पडायला वेळ लागणार नाही. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आपण अंड्यासोबत कधीही खाऊ नये.

अंड्यांसोबत कोणत्या गोष्टी खाऊ नयेत?

अंडी आणि सोया प्रॉडक्ट्स

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंड्यांव्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये सोयाबीन आणि सोया उत्पादनांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत जर आपण अंड्यांसोबत सोया फूड्स खाल्ले तर शरीरात प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असेल, जे आपले शरीर पचवू शकणार नाही. यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते.

अंडी आणि केळी

तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये फायबरसह अनेक पोषक घटक असतात. त्याचप्रमाणे अंडी देखील एक सुपरफूड आहे परंतु दोन्ही एकत्र खाऊ नये. असे केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. दोन्ही गोष्टी खाव्या लागल्या तरी त्यामध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.

अंडी आणि मिठाई

अंड्यांसह मिठाई किंवा जास्त साखरयुक्त पदार्थ खाणे चुकीचे मानले जाते. असे केल्याने पोट खराब होऊ शकते. जर तुम्हाला दोन्ही गोष्टी खाव्याशा वाटत असतील तर एक एक करून खा. एक गोष्ट खाल्ल्यानंतर किमान एक तासाने दुसरी गोष्ट खा. जेणेकरून तुमचे शरीर ते सहज पचवू शकेल.

अंडी आणि चहा-कॉफी

डॉक्टरांच्या मते, एखाद्या व्यक्तीने अंडी सोबत चहा आणि कॉफीसारख्या उच्च कॅफिन असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे पोटदुखी आणि अपचनाचाही सामना करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

प्रत्येक शॉटआधी २० लिटर दूध अन् गुलाबाच्या पाकळ्यांनी अंघोळ? रवि किशन यांनी सांगितला सेटवरचा किस्सा!

H-1B Visa: IBM चा भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; एक तर अमेरिका सोडा किंवा नोकरी सोडा!

Latest Marathi News Live Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 84.36% मतदान

Vedant Sehwag 7 Wickets: वीरूच्या लेकाने घेतल्या ७ विकेट्स! वेदांत सेहवागच्या माऱ्यासमोर भलेभले गार; आर्यवीरने टोलावले ३ चौकार, २ षटकार

SCROLL FOR NEXT