friendship day history
friendship day history 
लाइफस्टाइल

Friendship Day: 1 ऑगस्ट आणि 30 जुलैच्या फ्रेंडशिप डेमध्ये काय फरक असतो?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आयुष्यात इतर नात्यांपेक्षा अनेकदा मैत्री जवळची वाटते. कसलंच बंधन नसलेल्या या नात्याची गोष्टच वेगळी आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतासह अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी 30 जुलैला इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. यामुळे नेमका कोणता फ्रेंडशिप डे आणि अशा दोन दोन दिवशी का साजरा करण्यात आला असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. खरंतर फ्रेंडशिप डे अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. मित्र एकमेकांना गिफ्ट किंवा कार्ड देतात. मित्रासोबत मनमोकळ्या गप्पा मारतात आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेशनही करतात. 

भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यानं बरेच डे हे रविवारी सेलिब्रेट केले जातात. भारतासह इतर देशांमध्येही फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करतात. मित्र आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. या दिवशी मैत्री निभावणाऱ्यांचे आभार मानू शकता. आयुष्यात अशा मित्रांची आठवण काढण्यासाठी एकच दिवस पुरेसा नसतो मात्र तरीही खास शुभेच्छा देऊन मैत्री आणखी वृद्धींगत करता येते. 

पहिला फ्रेंडशिप डे पराग्वेमध्ये 1958 ला साजरा करण्यात आला होता. Dr Ramon Artemio Bracho यांनी त्यांच्या मित्रांना डिनरला बोलावलं होतं तेव्हा मित्रांसमोर ही कल्पना मांडली आणि त्यातूनच वर्ल्ड फ्रेंडशिप क्रूसेडला प्रोत्साहन मिळालं.  दुसऱ्या बाजुला फ्रेंडशिप डेची सुरुवात 1930 ला झाली होती असंही म्हटलं जातं. हॉलमार्क ग्रिटिंगचे संस्थापक जॉयस हॉल यांनी 1930 मध्ये फ्रेंडशिप डेच्या नावाची कल्पना सुचवली होती. त्यांनी मित्रांना ग्रिटिंग कार्ड देऊन फ्रेंडशिप डेसुद्धा साजरा केला होता.  

जगभरात वेगवेगळ्या देशात वेगवगेवळ्या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. 1998 मध्ये संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांची पत्नी नैन अन्नान यांनी युएनमध्ये विनी द पूह या कार्टून व्यक्तिरेखेला मैत्रीचा जागतिक दूत म्हणून घोषित केलं होतं.  संयुक्त राष्ट्राने 27 एप्रिल 2011 मध्ये 30 जुलै हा अधिकृत इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून घोषित केला. मात्र भारतासह अनेक दक्षिण आशियाई देश ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT