Heart Emoji  google
लाइफस्टाइल

Heart Emoji : हृदयाचा आकार वेगळाच असताना 'लाल दिल' हे हृदयाचं प्रतीक कसं बनलं ?

प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण जे हृदय वापरतो ते माणसाच्या वास्तविक हृदयापेक्षा पूर्णपणे वेगळे असते.

नमिता धुरी

मुंबई : फेसबुकवर प्रतिक्रिया द्यायची किंवा व्हॉट्सअॅपवर प्रेम व्यक्त करायचं तर हार्ट इमोजी हा प्रत्येकासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पण आता प्रश्न पडतो की खऱ्या हृदयाचा आकार या हृदयापेक्षा पूर्णपणे वेगळा असताना हे दिल आले कुठून ?

या हार्ट इमोजीच्या आकाराचा इतिहास काय आहे आणि आकार पहिल्यांदा कोणी बनवला. त्याहूनही मोठा प्रश्न हा आहे की हृदयाचा आकार असा का बनवला गेला ? (history of Heart Emoji why Heart Emoji is not like real heart laal badam red heart) हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत 

हृदयाची रचना कशी करावी ?

प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण जे हृदय वापरतो ते माणसाच्या वास्तविक हृदयापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. वास्तविक, ज्या हृदयाचा वापर आपण शतकानुशतके प्रेमाचे प्रतीक म्हणून करत आलो आहोत, ते खरं तर रोपाच्या बीजातून आले आहे.

ही वनस्पती सिल्फियमची होती. हिस्टोरिया IV.169 या आपल्या पुस्तकात याचा उल्लेख करून हेरोडोटस या ग्रीक इतिहासकार आणि भूगोलशास्त्रज्ञाने लिहिले आहे की या वनस्पतीच्या बिया गर्भनिरोधक म्हणून वापरल्या जात होत्या.

आता मूळ प्रश्नाकडे येऊ या की हृदयाचा आकार कसा तयार झाला. खरं तर, या वनस्पतीच्या बियांचा आकार हार्ट इमोजीसारखा असतो.

हे डिझाइन इतके लोकप्रिय कसे झाले ?

अनेक कथांमध्ये असा दावा केला जातो की, शतकानुशतके लग्नाआधी मुलगा आणि मुलगी यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होत असत. तेव्हा मुलगे मुलीला नको असलेल्या गर्भधारणेपासून वाचवण्यासाठी या बिया तिच्याकडे पाठवत असत.

हळूहळू या बीजालाच प्रेमाचे लक्षण मानले जाऊ लागले आणि लोक या सिल्फियम बियाच्या आकाराला हृदयाचा आकार मानू लागले. ही कथा सोशल मीडिया आणि काही वेब पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्यांवर आधारित आहे. आम्ही तिच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT