लाइफस्टाइल

Holi 2024 : होळीसाठी बनवा स्पेशल मालपुआ, रेसिपी आहे एकदम सोप्पी!

वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते

सकाळ डिजिटल टीम

Holi 2024 :

होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो. हा सण राधा आणि भगवान श्री कृष्णांचे प्रेम साजरे करते. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो.

होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते. होळी दिवशी महाराष्ट्रात पुरणपोळी केली जाते. तर भारतातील इतर भागात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. यातही मालपुआ स्पेशली बनवला जातो. (Malpua Recipe)

सणासुदीला बाजारातून मिठाई विकत घेण्याऐवजी तुमच्या मित्रपरिवारासाठी आणि घरच्यांसाठी ही मिठाई बनवू शकता. चला,तर मग मालपुआ कसा बनवायचा ते या लेखात जाणून घेऊयात..

साहित्य :

२ वाट्या मैदा, १ वाटी बारीक रवा, २ वाट्या साखर, ५ ते ६ वेलदोड्याची पूड, तूप, दूध, १०० ग्रॅम खवा, बदाम, काजूचे काप, चारोळी, बेदाणे, २ टे. स्पून पिठीसाखर (Food)

कृती :

  • मालपुवा करायच्या आदल्या दिवशी रात्री रवा, मैदा, साखर एकत्र करून दूधामध्ये सरबरीत भिजवून झाकून ठेवावा.

  • दुसऱ्या दिवशी सपाट तव्यावर तूप घालून छोटी धिरडी मंद आचेवर करावीत.

  • खवा हाताने मोडून घ्यावा. त्यात वेलदोडे पूड, काजू, बदाम काप, चारोळी, बेदाणे व २ टे. स्पून पिठीसाखर घालून सारणाप्रमाणे कालवावे.

  • मालपुव्याच्या केलेल्या धिरड्यात खव्याचे थोडे सारण पातळ पसरावे व धिरड्याची अर्धी घडी घालावी. असे सर्व मालपुवे करावेत. वरून आवडत असल्यास थोडा चांदीचा वर्ख लावावा. हे मालपुवे फारच छान लागतात.

टीप :

मालपुव्यांच्या पिठात साखर न घालता नुसत्या रवा मैद्याची धिरडी करून साखेरच्या १ तारी पाकातून ती धिरडी काढून पण मालपुवे करता येतात.

(ही रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या ‘हमखास पाकसिद्धी’ या पूस्तकातून घेण्यात आली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT