Holi Rangoli Designs 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi Rangoli Designs 2024 : होळीच्या दिवशी सजवा तुमचे घर, अंगणात काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या

Holi Rangoli Designs 2024 : होळीच्या सणाला अंगण आणि घर सजवले जाते. अंगणात सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Holi Rangoli Designs 2024 : भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. २४ मार्चला होलिका दहन केले जाणार असून २५ मार्चला देशभरात रंगांची होळी खेळली जाणार आहे. होळीच्या निमित्ताने लोक एकमेकांच्या घरी जाऊन होळीच्या शुभेच्छा देतात. एकमेकांना रंग लावतात.

होळीच्या सणाला अंगण आणि घर सजवले जाते. अंगणात सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. विविध रंगांचा आणि फुलांचा वापर करून रांगोळ्या काढल्या जातात. यंदाच्या होळीला तुम्हाला देखील सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या काढायच्या असतील, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला खास होळीनिमित्त रांगोळीच्या काही आकर्षक डिझाईन्स सांगणार आहोत.

गोल आकारातील रांगोळी

होळीच्या दिवशी जर तुम्हाला सिंपल आणि तितकीच सुंदर रांगोळी अंगणात काढायची असेल, तर तुम्ही या प्रकारची गोल आकारातील रांगोळी काढू शकता.

Holi rangoli Design

या रांगोळीच्या डिझाईनमध्ये तुम्ही लहान पिचकारीचा वापर करू शकता आणि त्यात विविध रंग भरू शकता. तसेच, गोल आकारासाठी तुम्ही एखाद्या गोल भांड्याचा किंवा ताटाचा, प्लेटचा वापर करू शकता.

पानाफुलांची रांगोळी

कोणताही सण असो किंवा कार्यक्रम असो. तुम्ही त्यासाठी पानाफुलांची रांगोळी नक्कीच काढू शकता. काढायला अतिशय सोपी असणारी ही रांगोळी तुमच्या अंगणाची शोभा वाढवते.

floral designs

होळीला ही सोपी रांगोळी काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची पाना-फुलांची किंवा विविध आकारातील रांगोळीची डिझाईन काढू शकता. त्यानंतर, त्यात विविध रंग भरून तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचा ही वापर करू शकता.

पिचकारीच्या डिझाईनची रांगोळी

होळीला विविध प्रकारचे रंग आणि पिचकारी याला खास महत्व असते. त्यामुळे, या पिचकारीचा वापर करून तुम्ही होळीच्या दिवशी अंगणात सुंदर रांगोळी काढू शकता.

Pichkari design

लहान किंवा मोठी अशा कोणत्याही आकाराची पिचकारी घ्या. त्याचा वापर करून डिझाईन काढा आणि त्याच्या बाजूने सुंदर गालिचा काढा. तुम्हाला हवी असलेली कोणतीही पानाफुलांची किंवा वेगळ्या आकाराची डिझाईन तुम्ही काढू शकता. यामध्ये आता तुमच्या आवडीचे रंग भरा आणि रांगोळी सजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT