Home Made Detergent esakal
लाइफस्टाइल

Home Made Detergent : घरी बनवलेल्या या वॉशिंग पावडरने कपडे होतील एकदम चमकदार!

घरी बनवलेले वॉशिंग पावडरही फायदेशीर असते

Pooja Karande-Kadam

Home Made Detergent : कपडे धुणे हे कधीही न संपणारे काम आहे. वॉशिंग मशीनला असो वा हाताने कपडे धुण्याचे काम कधीच संपणारे नाही. कपडे धुवायला वापरले जाणारे ब्रँडेड डिटर्जंट चांगले असतात. पण, त्यामध्ये असलेले केमिकल्स कपड्यांचे आयुष्य कमी करतात.

जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचे आयुष्य वाढवायचे असेल तर तुम्ही घरच्या घरी स्वतःचे कपडे धुण्याचे वॉशिंग पावडर बनवू शकता. जसं घरी बनवलेले पदार्थ अधिक हेल्दी असतात. अगदी तसंच घरी बनवलेले वॉशिंग पावडरही फायदेशीर असते. ते कपड्यांसाठी हेल्दी असतो. ज्यामूळे कपड्यांचे आयुष्य वाढते.

सध्या बाजारात डिटर्जंट वड्यांऐवजी मागील पिढीमध्ये फक्त साबण मिळायचा. आज साबण फक्त स्नानाचा आणि कपडे धुण्यासाठी डिटर्जंट वडी किंवा पावडर अशा स्वरूपामध्ये मिळतो. घरी कपडे धुण्याचे वॉशिंग पावडर बनवणे हा आजचा प्रयोग आहे. युट्युबवर पाहून महिला अनेक पदार्थ, क्राफ्ट बनवत असतात. तसच आज आपण कपड्याचे वॉशिंग पावडर कसे बनवायचे हे पाहुयात.

यासाठी लागणारे साहित्य

१ किसलेला साबण, बोरॅक्स १ कप, वॉशिंग पावडर आणि ३ लिटर  पाणी

कृती

एका भांड्यात १ लिटर पाणी टाका. आता त्यात किसलेला साबण घाला आणि मध्यम आचेवर १५ मिनिटे ढवळत राहा. साबण वितळल्यावर त्यात वॉशिंग सोडा आणि बोरॅक्स घाला. ते विरघळेपर्यंत ढवळत राहा. आता हे मिश्रण एका मोठ्या डब्यात ठेवा आणि त्यात उरलेले दोन लिटर पाणी घाला. दुसऱ्या दिवशी वापरण्याआधी ते एकदा चांगले ढवळून घ्या आणि कपड्यांसाठी वापरा.

जेव्हा कपडे भिजवणार असाल तेव्हा एक ग्लासभर हे पाणी घेऊन त्यामध्ये आणखी पाणी वाढवून. त्यामध्ये कपडे भिजत घाला.

जेव्हा तुम्ही घरी लाँड्री डिटर्जंट बनवता आणि तुमची त्वचा संवेदनशील असते. तेव्हा तुम्ही वापरलेल्या घटकांमध्ये बदल करू शकता. सोडा आणि बोरॅक्स हे साबण तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहेत. त्यामूळे ते बाजूला काढले जाऊ शकत नाहीत. परंतु तुम्ही कपडे धुण्यासाठीच्या साबणाचा इतर पर्याय निवडू शकता.

साबण बनवण्यासाठी टिप्स

साबण बनवण्यासाठी योग्य घटक वापरणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला सुगंधित साबणांची ऍलर्जी असेल. तर तुम्ही आयव्हरी आणि क्रिस्टल सारखे साबण वापरू शकता. साबण बनवण्यासाठी मोठ्या भांड्याची आवश्यकता असते. बोरॅक्स आणि वॉशिंग सोडा हे साबण बनवण्यासाठी आवश्यक घटक असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice-President Election : देशाचे १७ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज मतदान; NDAचे राधाकृष्णन अन् INDIA चे रेड्डी यांच्यात लढत

Sachin Tendulkar : BCCIच्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकर अनुत्सुक? महत्त्वाची अपडेट समोर...नेमकं काय घडतंय?

'Gen Z'समोर झुकलं नेपाळ सरकार, २० मृत्यू अन् गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर बंदी हटवली

Minister Jayakumar Gore: ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेतली

Paneer Moong Dal Appe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पनीर मुग डाळ अप्पे, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT