Tanning Removal Tips
Tanning Removal Tips esakal
लाइफस्टाइल

Tanning Removal Tips : पायांवरील टॅनिंग जात नाहीये? मग,'या' सोप्या उपायांच्या मदतीने पायांचे सौंदर्य परत मिळवा

Monika Lonkar –Kumbhar

Tanning Removal Tips : उन्हाळ्याला आता सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात आपण आरोग्याची आणि त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे. या उन्हाच्या तीव्र झळांमुळे चेहरा, हात-पाय काळे पडतात. टॅनिंगची समस्या वाढते. हे वाढलेले टॅनिंग काही केल्या निघत नाही. हे टॅनिंग चेहऱ्यावर असो किंवा पायांवर ते सहजासहजी निघत नाही.

हे टॅनिंग दूर करण्यासाठी अनेक जण नानाविध उपाय करतात. काही महिला तर पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर करून घेतात. मात्र, याचा तात्पुरता फरक दिसून येतो. आता टॅनिंग सुद्धा काहींना जास्त प्रमाणात होते तर काहींना कमी प्रमाणात होते. त्यातल्या त्यात पायांवरील टॅनिंग लवकर हटत नाही.

मात्र, आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. तुमच्या पायांवरील टॅनिंग दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. या सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही टॅनिंगची समस्या दूर करू शकता आणि पायांचा उजळपणा आणि चमक पुन्हा मिळवू शकता. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात. (Tanning Removal Tips)

बेकिंग सोडा आणि दही

बेकिंग सोड्याचा वापर हा त्वचेसाठी प्रामुख्याने केला जातो. त्वचेवरील काळवंडलेपणा आणि टॅनिंग काढण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त आहे. आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी दही किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. दह्यामुळे त्वचा मऊ होते आणि त्वचेला उजळपणा मिळतो.

पायांवरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी ६ चमचे बेकिंग सोड्यामध्ये ३-४ चमचे दही मिसळा. हे मिश्रण चांगले एकत्र करा आणि पायांना लावा. अर्धा तास हे मिश्रण पायांवर असेच राहुद्या. त्यानंतर, पायांना मसाज करा आणि नंतर पाय कोमट पाण्याने धुवून टाका. (baking soda and curd)

दूध, हळद आणि टोमॅटो

हळद ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी हळदीचे अनेक फायदे आहेत. चेहऱ्यावरील फेसपॅक किंवा स्क्रब करताना आपण हळद, दूध आणि टोमॅटोचा अवश्य वापर करतो.

पायांचे टॅनिंग काढण्यासाठी सर्वात आधी टोमॅटोची पेस्ट करा. त्यामध्ये आता १ चमचा हळद आणि थोडे दूध मिसळा. हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. यामध्ये हवे असल्यास तुम्ही लिंबाचा रस ही मिसळू शकता. आता हे मिश्रण पायांना लावा आणि पायांचा मसाज करा. ३०-४० मिनिटांनंतर पाय कोमट पाण्याने धुवून टाका. पायांचे टॅनिंग निघून जाईल आणि पाय सुंदर चमकदार दिसतील. (Milk, turmeric and tomato)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT