Home Tips esakal
लाइफस्टाइल

Home Tips : करपलेल्या भांड्यांचे डाग जात नाही? करा कांद्याचे हे उपाय

भाजी करपली आणि भांड्याला चिकटली किंवा भांडे करपल्यावर त्याचे डाग जात नाहीत का ? खूप जोर लावून घासले तरी हात दूखतात पण डाग पूर्ण जात नसेल, तर कांद्याचे हे घरगुती उपाय करून बघा.

सकाळ डिजिटल टीम

जेवण बनवताना भांड करपणे ही फार सामान्य बाब आहे. पण त्यामुळे महिलांना फार त्रास होतो. घासून घासून हात दूखतात, पण भांड्यांवरचे डाग निघत नाहीत. असे डाग काढण्यासाठीचे कांद्याचे घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत.

व्हिनेगर आणि कांद्याने जातात डाग

करपलेल्या भांड्याचे डाग काढण्यासाठी एक मोठा कांदा आणि व्हिनेगर घ्या. त्यानंतर एका वाटीत अर्धा कप कांद्याचा रस व अर्धा कप व्हिनेगर मिक्स करून घ्या. नंतर त्या मिश्रणाने भांड स्वच्छ घासून घ्या. थोड्याच वेळात भांडं चमकू लागेल.

कांद्याच्या सालींचा वापर

करपलेले भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालींचाही उपयोग करू शकतात. या साली करपलेल्या भांड्यात टाकावे. त्यात पाणी घालून २० मिनीट उकळवा. सालींची त्यात एक पेस्ट तयार होईल. नंतर त्या पेस्टने भांडं स्वच्छ घासावे. तुमचं भांडं पहिल्यासारखे चमकू लागेल.

बेकींग सोड्यानेही भांडं होतं स्वच्छ

करपलेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. नंतर ब्रशच्या मदतीने भांडं घासावं. नंतर कांद्याचे दोन तुकडे करून जळालेल्या डागांवर घासावे. असे केल्याने मोठे डाग जातील. नंतर या भांड्यात पाणी भरून १० मिनीट ठेवावे. नंतर भांडं परत घासावं. भांडं परत पहिल्यासारखे शाईन करायला लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT