Vastu Tips sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार असे असावे घर; कोणत्या दिशेला काय असावे? जाणून घ्या

वास्तूनुसार घर बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Aishwarya Musale

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे? याचा उल्लेख अनेक वास्तु ग्रंथात आढळतो. वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा. दुसरीकडे, तुमच्या घराचा उतार पूर्व, उत्तर किंवा पूर्व-उत्तर (ईशान कोन) दिशेला असणे शुभ मानले जाते.

अशाप्रकारे वास्तूनुसार घरातील रूम्स, हॉल, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि बेडरुम एका विशिष्ट दिशेला असावेत. यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात.

पूर्व दिशा - पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा. या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरणे आपल्या घरात प्रवेश करतात. घराचे मुख्य गेट या दिशेला असेल तर ते खूप चांगले असते.

पश्चिम दिशा - तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे. लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावेत.

उत्तर दिशा - घरामध्ये या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत. घराची बाल्कनी आणि वॉश बेसिनही याच दिशेने असावे. मुख्य गेट या दिशेला असल्यास चांगले असते.

दक्षिण दिशा - दक्षिण दिशेला शौचालय असू नये. घरातील जड वस्तू या ठिकाणी ठेवा. या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे घरातील त्रास वाढतो.

ईशान्य दिशा - याला ईशान दिशा असेही म्हणतात. ही दिशा म्हणजे पाण्याचे ठिकाण. या दिशेला बोरिंग, जलतरण तलाव, पूजास्थान इत्यादी असावेत. या दिशेने मुख्य गेट असणे खूप चांगले आहे.

उत्तर-पश्चिम दिशा - तुमचे बेडरूम, गॅरेज या दिशेला असावे.

दक्षिण-पूर्व दिशा - याला घराचा आग्नेय कोन म्हणतात. ही अग्नि तत्वाची दिशा आहे. या दिशेला गॅस, बॉयलर, ट्रान्सफॉर्मर इ. असायला पाहिजे.

दक्षिण-पश्चिम दिशा - या दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात. या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत.घराच्या प्रमुखाची खोली आग्नेय कोपर्‍यात असणे शुभ मानले जाते. या दिशेने तुम्ही कॅश काउंटर, मशिन इत्यादी ठेवू शकता.

घराचे अंगण - घरामध्ये अंगण नसेल तर घर अपूर्ण राहते. घर लहान असले तरी समोर आणि मागे अंगण असावे. तुळस, डाळिंब, जामफळ, गोड किंवा कडू कडुलिंब, आवळा याशिवाय अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT