Homemade Hair Oil esakal
लाइफस्टाइल

Homemade Hair Oil : घरात बनलेलं हे तेल वापरा, केस गळती कायमची थांबवा!

केस अचानक गळायला लागते तर त्याची कारणं काय असू शकतात?

Pooja Karande-Kadam

Homemade Hair Oil : आजकाल सर्वांनाच केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. बिझी लाईफ स्टाईलमुळे केसांची निगा राखली जात नाही. वेळेवर तेल न लावल्याने केसांना योग्य ते पोषण मिळत नाही. त्यामुळेच केस अकाली पांढरे होणं, त्यांची वाढ खुंटण ते निर्जिव होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो.  

केस गळण्याची समस्या अशी असते की अनेकदा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. महिला असो वा पुरुष दोघांनाही केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात, परंतु फार कमी लोक असे असतात ज्यांच्या केसांच्या समस्या कमी होतात.

परंतु, येथे काही घरगुती उपाय आहेत जे केस गळती रोखण्यासाठी उपयुक्त आहेत आणि नवीन केस वाढविण्यासाठी प्रभावी सिद्ध होऊ शकतात. हे तेल तुम्ही घरी बनवून सहज तयार करू शकता. केस गळतीसाठी हेअर ऑईल कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.

केस का गळतात

  1. ताणतणाव, अस्वस्थ आहार, यकृतातील समस्यांमुळे केस गळती होते.

  2. केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमुळे देखील केस गळण्याची समस्या उद्भवते.

  3. स्टेरॉईड्सच्या नियमित वापरामुळे केस गळू लागतात.

  4. औषधांचे हानिकारक प्रभावामुळे देखील केस करण्याची समस्या निर्माण होते.

  5. हार्मोन्सच्या पातळीत बदल, बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतेक स्त्रियांची केस गळती होते.

  6. जुनाट आजार, शस्त्रक्रिया, गंभीर संक्रमण, शारीरिक ताण आणि इन्फेक्शनमुळे केस गळतात.

  7. बऱ्याचदा अनियोजित जीवनशैलीमुळे देखील केस गण्याची समस्या उद्भवते.

तेल कसे तयार करावे

हे तेल तयार करण्यासाठी तुम्हाला कढीपत्ता, गुळाचे फूल आणि मेथीदाणे लागतील. तेल तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये खोबरेल तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मूठभर कढीपत्ता घाला आणि थोडे शिजल्यावर गॅसवरून तेल काढून टाका. त्यानंतर त्यात मेथीदाणे घालून त्यात गुळाची फुले घालून बाजूला ठेवावे.

हे तेल रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं डोक्याला मसाज करा आणि काही वेळाने केस धुवा. या तेलाचा परिणाम केसगळती आणि केसांची वाढ थांबवण्यात दिसू लागतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि तज्ज्ञ ऋजुता दिवेकर देखील हे तेल लावण्याचा सल्ला देतात.

डोकं धुण्यासाठी तांदळाचं पाणी कसं बनवावं हे ही तुम्हाला माहित आहे, केस लांब तर होतीलच पण चमकदारही दिसतील.

कांद्याचं तेल

घरातील इतर अनेक तेल प्रभावी ठरू शकतात. कांद्याचे तेल तुम्ही घरी बनवून लावू शकता. कांद्याचे तेल बनवण्यासाठी कांदा लहान तुकडे करून खोबरेल तेलात मिसळून शिजवा. चांगले शिजल्यानंतर हे तेल गाळून घ्या. कांद्याचे तेल केसांना लावण्यासाठी तयार आहे.

बदाम कडुनिंब तेल 

बदामाच्या तेलात कडुनिंबाची पाने शिजवून कडुलिंबाचे तेल बनवता येते. कडुनिंबाचे तेल केसांना अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देते आणि केस गळण्याच्या समस्येवरही प्रभावी ठरते. नारळाचे तेल घालून मुठभर कडुलिंबाची पाने शिजवता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT