how to care skin in summer nagpur news
how to care skin in summer nagpur news 
लाइफस्टाइल

मार्चमध्येच वाढलाय उन्हाचा तडाखा, तरीही चेहऱ्यावरील सुंदरता कायम ठेवायची? मग 'अशी' घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सध्या उन वाढत चाललंय. विदर्भात मार्चमध्येच पारा चाळीशीवर पोहोचला. त्यामुळे चेहरा काळा पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच अनेकजण उन्हामध्ये बाहेर निघण्याचे टाळतात. उन्हाळ्याच्या दिवसात रखरखतं उन आणि यूव्ही रेडिएशनमुळे त्वचेची नैसर्गिक सुंदरता कमी होते. परिणामी त्वचा कोरडी पडते. तसेच त्वचेचा रंग जास्तच काळा होत जातो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी कशी घ्यायची? याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उन्हाळ्यात त्वचेचा रंग काळा का पडतो? -
आपण थेट सूर्याच्या सानिध्यात आल्यास त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे चेहऱ्याच्या रंगात फरक पडतो. तसा विचार केला तर मेलेनिन हे सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करते. त्वचेच्या आतमधील भागात मेलनिन तयार होत असून काही दिवसानंतर चेहऱ्यावर दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळेच चेहऱ्याचा रंग काळा पडतो. मेलेनिनचा आपले केस आणि त्वचेवर वेगवेगळा परिणाम होतो. आपल्या केसांसाठी तयार होत असलेले मेलेनिन सूर्याच्या प्रकाशामुळे नष्ट होते. त्यामुळेच मुळापासून उगवलेले केस हेल्दी दिसतात आणि वाढल्यानंतर केसांचा रंग बदलतो. सूर्यप्रकाशाच्या सर्वाधिक संपर्कात आल्यामुळे केसांवर त्याचा परिणाम होत असतो. मेलेनिनला त्वचेचे सुरक्षा कवच मानले जाते. मात्र, अधिक प्रमाणात मेलेनिन असणे हे देखील धोकादायक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाचा चेहऱ्यावर काय होतो परिणाम -
कधी कधी चेहऱ्यावर उन्हाचा परिणाम लवकर दिसतो, तर कधी उशिरा. जे लोक गोरे असतात त्यांच्या चेहऱ्यावर उन्हाचा लवकर परिणाम होतो. तसेच त्यांची त्वचा काळी किंवा लाल पडते. त्यालाच इंग्रजीमध्ये डिलेड टॅनिंग म्हणतात. चेहऱ्यामध्ये जितक्या जास्त प्रमाणात मेलेनिन तयार होते तसाच चेहऱ्याचा रंग बदलत जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाहेर जाण्याचे टाळल्यास चेहरा सुरक्षित राहण्यास मदत होते. तुम्हाला उन्हामध्ये बाहेर पडायचेच असेल तर सनस्क्रीनचा वापर करा. त्यामुळे चेहऱ्याचा रंग, तजेलदारपणा, चमचमणारी त्वचेवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच आपल्या खाण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे गरमीला हरवून तुम्ही तुमच्या त्वचेचे संरक्षण करू शकता.

हेल्दी त्वचेसाठी काय खावे?
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, केळी आणि सफरचंद या फळांमध्ये ब, ड आणि ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. या फळांचे सेवन केल्यास त्वचेला पोषण मिळत असते. तसेच चेहऱ्यावरून तुमचे वय देखील ओळखायला येत नाही. तसेच अॅवाकॅडो, पेरू, अंजीर, खजूर, करवंद यामध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपली पाचनक्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच नट्स आणि फ्लैक्स हृदयासंबधी रोग, कँसर, मधुमेह, हायपरटेंशन या आजारांपासून सुटका मिळते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील अधिक असते. तसेच पॅनबेरीज, खरबूज, केळी आणि द्राक्षांमध्ये जीवनसत्व आणि अंटीअॅक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कोलेजन तुटण्यापासून बचाव होतो आणि त्वचा चमकण्यास मदत होते. 

हे करा -
उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर निघताना सनस्क्रीन लावा
ऑफिस किंवा महाविद्यालयात जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा
हेल्दी फूड खावे आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
बाहेर निघताना चेहऱ्याला स्कार्फ बांधायला विसरू नका.
चेहऱ्याला प्रत्येक दोन ते तीन तासांतमध्ये पाण्यानी धुवायला विसरू नका.
सर्वाधिक पाणी प्या आणि दिवसांतून दोन ते तीन वेळा लिंबू पाणी प्यायला विसरू नका.
कॉटनचे कपडे घालण्यास प्राधान्य द्या.

हे करू नका -
उन्हाळ्यामध्ये घरा बाहेर निघणे टाळा
बाहेर जाताना जास्त मेकअप करू नका
कूलर किंवा एसीमधून निघून लगेच बाहेर पडू नका
मसालेदार पदार्थ खाऊ नका
दुपारी उन्हात बाहेर फिरू नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT