Gulkand  Sakal
लाइफस्टाइल

Gulkand Recipe: गुलकंद घरच्या घरी कसा बनवायचा? वाचा ही सोपी रेसिपी

उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन केल्यास शरीराला शीतलता आणि ऊर्जा मिळते.

Aishwarya Musale

गुलकंद हे चवदार तसेच आरोग्यदायी असते. आम्ही तुमच्यासाठी आज घरी गुलकंद बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. साखरेच्या साहाय्याने आणि गुलाबाच्या पाकळ्याने गुलकंद तयार केला जातो. गुलकंदला अनेक जण गुलाबाचा जॅम देखील म्हणतात.

गुलकंदाचे उन्हाळ्यात सेवन केल्यास आपल्या शरीराला शीतलता आणि ऊर्जा मिळते. तुम्ही रेग्युलर जॅमच्या जागी हे करू शकता. तसेच गुलकंद एक उत्तम माऊथ फ्रेशनर म्हणूनही काम करते, चला तर मग जाणून घेऊया घरी गुलकंद कसे बनवायचे.

गुलकंद तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

  • गुलाबाच्या ताज्या पाकळ्या

  • साखर

  • बडीशेप 1 टीस्पून

  • वेलची पावडर

गुलकंद कसे बनवायचे?

  • आधी ताजे गुलाब घ्या.

  • त्यांनतर पाकळ्या तोडून स्वच्छ पाण्याने धुवून वाळवाव्यात.

  • एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर टाका.

  • नंतर साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या नीट मॅश करा.

  • एका कढईत नंतर साखर आणि गुलाबाचे मिश्रण घालावे.

  • साधारण 2-3 मिनिटे गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्या.

  • 1 चमचा बडीशेप आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.

  • 2-3 मिनिटे शिजवून घ्या.

  • त्यात 1 चमचा मध घालून मिक्स करा.

  • ते चांगले वितळून नंतर जॅम सारखं मिश्रण तयार करा.

  • तुमचा स्वादिष्ट गुलकंद तयार आहे.

  • गुलकंद पूर्णपणे थंड झाल्यावर आपण ते काचेच्या जारमध्ये साठवून ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT