Skin Care
Skin Care esakal
लाइफस्टाइल

Skin Care : स्क्रबिंग किती वेळ करावं हेसुद्धा माहिती असणं गरजेचं? नाहीतर चेहरा...

सकाळ डिजिटल टीम

Skin Care : त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे, विशेषत: उन्हाळ्यात त्वचा उन्हामुळे निस्तेज दिसून लागते अशा वेळी त्वचेची योग्य काळजी घेणे महत्वाचे ठरते. चेहऱ्यावर जमा झालेली धुळ आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासठी स्क्रबिंग करणे फार गरजेचे आहे. स्क्रब करत तुम्ही तुमच्या चेहऱ्याची खोलवर स्वच्छता करू शकता. जेव्हा चेहरा डल होतो तेव्हा स्क्रबिंगच्या मदतीने आपण चेहऱ्याची त्वचा उजळ करू शकतो.

स्क्रबिंग केल्यावरच त्वचा अॅक्टिव्ह होते आणि इतर प्रोडक्ट्स योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते, परंतु अनेकदा स्क्रब करताना आपण मोठ्या चुका करतो. ज्यानंतर त्याचे साइड इफेक्ट्स आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. अनेक वेळा पार्लरमध्येही चुकीच्या पद्धतीने एक्सफोलिएशन केले जाते, त्यामुळे चेहऱ्याचा बाहेरचा थर खराब होतो आणि पिंपल्ससारखे डाग आता दिसू लागतात. आज आपण जाणून घेणार आहोत की स्क्रब करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तसेच स्क्रबिंग किती वेळ करावं तेही जाणून घेऊया.

किती वेळ स्क्रबिंग करणे योग्य

आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा स्क्रबिंग करणे योग्य मानले जाते. स्क्रबिंग करण्यासाठी बोटावर स्क्रब घ्या आणि त्याला चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमधे अप्लाय करा. आणि चेहऱ्यावर स्क्रबिंग फक्त दोन ते तीन मिनिटेच करा. जास्त स्क्रबिंग केल्याचे चेहऱ्याची बाहेरची त्वचा डॅमेज होऊ लागते. स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्याला थंड्या पाण्याने धुवून घ्या. अनेक स्त्रिया अपूर्ण माहितीअभावी बऱ्याच वेळ चेहऱ्यावर स्क्रब अप्लाय करतात. पार्लरमधेसुद्धा १० मिनिटांपर्यंत स्क्रबिंग केली जाते. याचे फायदे कमी आणि नुकसान तुम्हाला जास्त झाल्याचे दिसून येईल. तुमच्या त्वचेची आऊटर लेयर डॅमेज व्हायला लागते.

स्क्रब केल्यानंतर फॉलो करा या स्टेप्स

स्क्रब केल्याने चेहरा डिप क्लिन होतो. त्यामुळे इनर पोअर्स क्लिन होतात. आणि तुमची त्वचा कुठलेही प्रोडक्ट शोषण्यास रेडी असते. मात्र अनेकदा लोक स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्याला काहीही लावतात. स्क्रबिंग केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला सुट होणारं मॉश्चरायझर लावा. जेणेकरून तुमची स्किन चांगली हायड्रेट होईल आणि ग्लोइंग दिसू लागेल.

घरी या गोष्टींनी स्क्रबिंग करा

घरी स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही कॉफी वापरू शकता. ते बनवण्यासाठी एक चमचा कॉफीमध्ये मध मिसळा आणि चेहऱ्यावर स्क्रब म्हणून वापरा. याशिवाय तांदळाच्या पिठात मध मिसळूनही तुम्ही स्क्रब करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील दागसुद्धा नाहीशे होतात. (skin care)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

Ravindra Waikar : वायकरांच्या मतदारसंघात खरंच निकाल बदलला का? मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं? कीर्तिकरांनी सांगितला घटनाक्रम

Indus Battle Royale: बॅटल रॉयलचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

SCROLL FOR NEXT