Weight Loss esakal
लाइफस्टाइल

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे संत्री, कसे ते जाणून घ्या

वाढलेले वजन कमी करण्यासाठी फळे अतिशय फायदेशीर आहेत. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. हे पोषकघटक आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Weight Loss : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या सगळ्यात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करतो.

मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की वाढलेले वजन कमी करण्यासाठी फळे अतिशय फायदेशीर आहेत. फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि मिनरल्सचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, फळांचा आहारात समावेश करणे हे फायद्याचे ठरते.

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी लिंबूवर्गीय फळे महत्वाची आहेत. या फळांमध्ये संत्रा या फळाचा समावेश आहे. वजन कमी करण्यासाठी संत्रा हे फळ अतिशय फायदेशीर आहे. कसे ते जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन सी

संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते. विविध संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला दूर ठेवते. या व्यतिरिक्त शरीरातील पचनक्षमता सुरळीत ठेवण्याचे काम संत्रा करते आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते. (vitamin c for weight loss)

कॅलरीजचे प्रमाण कमी

संत्र्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

मध्यम आकाराचे फळ असलेल्या या संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि फायबर्सचा समावेश असतो. त्यामुळे, हे फळ आपल्या दररोजच्या सेवनाच्या १००%  गरजा पूर्ण करू शकते. या फळाचे सेवन केल्याने आपले पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. (low calories for weight loss)

उच्च फायबरयुक्त फळ

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्सचा समावेश असतो. या लिंबूवर्गीय फळातील फायबर्समुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट भरलेले राहते. फार भूक लागत नाही. उत्तम आरोग्यासाठी फायबर्सचे जास्त सेवन करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे, शरीराला ताकद मिळते. या उच्च फायबरयुक्त संत्र्यामुळे वजन कमी करण्यास, शरीरातील चरबी घटवण्यासाठी आणि बॉडी मास इंडेक्स सुधारण्यास देखील मदत होते. (high fibers for weight loss)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT