mental health and chess Sakal
लाइफस्टाइल

Mental Health: मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मुलांसोबत खेळा बुद्धिबळ

Mental Health: मुलांमध्ये आजकाल नैराश्य, एन्झाईटी, एकटेपणा इत्यादी समस्या सामान्य आहेत. यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या समस्याच कशाप्रकारे हाताळाव्यात हे शिकणे होय. पालकांसाठी मुलांना या अडचणींवर मात करणे शिकवण्यासाठी बुद्धिबळ एक उत्तम साधन ठरू शकते.

सकाळ वृत्तसेवा

Mental Health: मुलांमध्ये आजकाल नैराश्य, एन्झाईटी, एकटेपणा इत्यादी समस्या सामान्य आहेत. यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या समस्याच कशाप्रकारे हाताळाव्यात हे शिकणे होय. पालकांसाठी मुलांना या अडचणींवर मात करणे शिकवण्यासाठी बुद्धिबळ एक उत्तम साधन ठरू शकते. बुद्धिबळाच्या साहाय्याने मुलांना अगदी लहान वयातच या अडचणींचा सामना कसा करायचा, हे शिकवता येते आणि त्याचे भविष्य सोपे आणि सहज करता येते.

बुद्धिबळाच्या साहाय्याने एंझाइटीसारखी समस्या दूर करता येऊ शकते. बुदधिबळ हा मनाला शांत करण्यासाठी एक उत्तम खेळ आहे. अनेक मुलांना एंझाइटी वाढण्याची समस्या असते. अशा वेळेस बुद्धिबळ खेळल्याने मुले शांत राहतात. अशा स्थितीत मुले बोलण्यास तयार नसतात तेव्हा पालकांनी त्यांना एखादा खेळ खेळू देणे आवश्यक आहे. ज्यामध्ये त्यांना कोणाशीही संवाद साधावे लागणार नाही आणि काही वेळात ते सामान्य स्थितीत येतील.

काही मुलांना त्यांना येणाऱ्या समस्या पालकांसमोर बोलून दाखवणे अवघड जाते. कारण त्यांच्यात असा गैरसमज असतो की त्यांना चुकिचे ठरवले जाई. बहुतांश मुले गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात आणि कोणाला एकही कळू नये म्हणून ते नेहमीप्रमाणे वागतात.

पण जर पालकांनी या सर्व गोष्टी वेळीच लक्षात घेऊन मुलांना कोणत्याही खेळात किंवा कलाप्रकारामध्ये गुंतवणायचा प्रयन्त केला पाहिजे. बुद्धिबळ खेळात असाल तर मुलांच्या खेळण्याचा पद्धती वरून काहीतरी चूक आहे, हे तुम्हाला समजेल. मुलांशी संवाद साधण्यासाठी ही उत्तम सुरुवात आहे. पालकांनी मुलांबरोबर बरोबर वेळ घालवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

एकाकीपणा ही मुलांमध्ये विशेषत: इन्ट्रोव्हर्ट मुलांमध्ये आढळणारी आणखी एक सामान्य समस्या आहे. अशा मुलांसाठीसुद्धा हा एक उत्तम खेळ आहे. कारण याखेळामध्ये कोणाशीही संवाद साधण्याची जास्त गरज नाही, एकाग्र असण्याची गरज असते. त्यामुळे त्यांना सहजतेने सारख्या विचाराची मुले मिळतील ज्याच्यासोबत ते सहज मैत्री करू शकतात.

आत्मविश्वास हा मुलांमध्ये असणे आवश्यक आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी बुद्धिबळ हा उत्तम खेळ आहे. काही मुले सतत कोणत्याही क्षेत्रात येणाऱ्या पराभवांना घबरून रडतात, परंतु बुद्धिबळाचे धडे घेतल्यानंतर काही महिन्यातच पालकांना असे लक्षात येईल की बुद्धिबळाचा निरंतर सरावामुळे येणाऱ्या पराभवांना मुले खंबीरपणे सामोरे जातात आणि प्रत्येक वेळी ते त्यांचा चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात.

बुद्धिबळ काही मुलांसाठी थोडे कठीण असू शकते, त्यामुळे ते सहजासहजी हार मानतात. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांसोबत संवाद साधून त्यांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्सहान दिले पाहिजे. आजकाल पालक मुलांना कठीण परिस्थितींना सामोरे जाऊ देऊ इच्छित नाहीत जे चुकीचे आहे. मुलांना चांगले भविष्य हवे असल्यास त्यांना काहीतरी साध्य करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

4 ते 7 या वयात जर मुले बुद्धिबळ शिकली तर त्यांचा बौद्धिक विकास फार चांगला होऊ शकतो. नियमित बुद्धिबळ खेळणाऱ्या मुलांचे गणित सुधारते, अभ्यासात एकाग्रता वाढते आणि एका जागेवर बसून राहण्याची क्षमता देखील वाढते. बऱ्याच वेळा असेही दिसून आले आहे की बुद्धिबळ खेळणाऱ्या मुलांच्या विचार करण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या असतात.

एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन राहत नाही, वेगवेगळ्या दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टी बघतात. ह्या सवयींचा भविष्यात फार फायदा होऊ शकतो. दीर्घकाळ बुद्धिबळ खेळणारा माणूस सहजा सहजी कुठल्याही परिस्थितीमध्ये लगेच प्रतिक्रिया देत नाही. तो प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच उत्तर देतो. त्यामुळे जर मुलांनी कमी वयातच बुद्धिबळ खेळायला चालू केले तर त्यांना सवय लागू शकते.

बुद्धिबळ मुलांसाठी फक्त एक सामान्य खेळ नाही तर जीवनाचे धडे देणारा खेळ आहे. त्यामुळे पालकांनो तुमच्या मुलांना बुदधिबळाचे धडे द्या आणि त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा बुद्धिबळ खेळा. या सोबतच तुमच्या पाल्यांना या खेळाच्या माध्यमातून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण मिळतील याची खात्री बाळगा.

- आशीर्वाद तुपे, बुद्धिबळ प्रशिक्षक, व्हाईट नाइट चेस अकादमीचे संस्थापक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT