Relationship google
लाइफस्टाइल

Relationship Tips : तुमच्या पहिल्या प्रेमाबद्दल आई-वडिलांना कसं सांगाल ?

जर त्यांना दुसर्‍या कोणाकडून कळले तर आपल्या मुलाने आपल्यापासून काहीतरी लपवले याचे त्यांना वाईट वाटेल.

नमिता धुरी

मुंबई : तुमच्या प्रियकराबद्दल/ प्रेयसीबद्दल तुमच्या पालकांना सांगणे कदाचित सोपे नसेल, विशेषतः तुम्ही किशोरवयीन असल्यास. त्यांना तुमच्याबद्दल काळजी वाटेल आणि तुमचे नाते नाकारले जाऊ शकते.

आपल्या पालकांच्या प्रतिक्रियेबद्दल चिंताग्रस्त होणे स्वाभाविक आहे परंतु आपल्या पालकांना आपल्या नातेसंबंधाबद्दल सांगण्यापासून परावृत्त होऊ नका कारण शेवटी, त्यांना कुठूनतरी कळेलच.

जर त्यांना दुसर्‍या कोणाकडून कळले तर आपल्या मुलाने आपल्यापासून काहीतरी लपवले याचे त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे योग्य पद्धतीने वेळीच त्यांना सगळं सांगून टाका. हेही वाचा - जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

१. तुमचा जवळचा मित्र किंवा मैत्रीण म्हणून त्या व्यक्तीची पालकांशी सहज ओळख होईल याची काळजी घ्या. वाढदिवसाला किंवा घरातल्या एखाद्या कार्यक्रमाला इतर मित्रांसोबत आणि कधीकधी एकट्यालाच घरी बोलवा.

तुम्ही त्याच्यासोबत कुठे बाहेर जात असाल तर घरी तसा कळवा. यामुळे पालकांच्या मानसिकता हळूहळू त्याला स्वीकारण्यासाठी तयार होईल.

२. इतर गोष्टींशी संबंधित स्वत:चे निर्णय स्वत:च घ्या जेणेकरून तुम्ही पुरेसे मोठे झाला आहात हे पालकांना पटेल. परिणामी लग्नाचा निर्णय तुम्ही स्वत: घेत आहात हे स्वीकारणे त्यांना जड जाणार नाही.

३. तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे काम पालकांना दिसेल याची काळजी घ्या. घरात त्याच्या कामाबद्दल बोला.

४. या व्यक्तीचा विचार तुम्ही भावी जोडीदार म्हणून केल्यास काय हरकत आहे हे पालकांना विचारा. जर त्यांनी मान्य केले तर खरं काय ते सांगून टाका. त्यांना नकार दिल्यास त्यामागील कारणांवर काम करा.

५. आईवडिलांपैकी कोण जास्त मोकळेपणाने बोलू शकेल याचा अंदाज घ्या. आधी एकाची मानसिक तयारी करून घ्या म्हणजे दुसऱ्याला पटवून देणे सोपे जाईल.

६. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची नाराज न होता सविस्तर, प्रामाणिक उत्तरं द्या.

७. पालकांकडून एकाएकी होकाराची अपेक्षा ठेवू नका. आधी त्यांना भेटण्यासाठी तयार करा.

८. भेट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी बोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT