Work Life Balance: Sakal
लाइफस्टाइल

Work Life Balance: धावपळीच्या आयुष्यात कसा साधाल वर्क-लाईफ बॅलन्स? 'या' सोप्या गोष्टी येतील कामी

Work Life Balance: धावपळीच्या आयुष्यात वर्क लाइफ बॅलन्स करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

how to balance work life stress personal and professional work stress read full story

नोकरी करणाऱ्या लोकांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन ठेवणे अवघड होते. तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्यास आयुष्यात होणारे गोंधळ आणि अडचणी कमी करू शकता. जर तुम्हाला आयुष्यात कामाच्या तणावामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत असेल तर वर्क लाइफ बॅलन्ससाठी पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

वर्क लाईफ बॅलन्स साधण्यासाठी काय करावे

  • मर्यादा ठरवा

काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल ठेवण्यासाठी मर्यादा ठरवाव्या. यासाठी घरी ऑफिसचे काम आणू नका. यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राहील.

  • स्वत:ला महत्व द्यावे

वर्क लाइफ बॅलन्स साधण्यासाठी स्वतःला महत्त्व द्यावे. कामाच्या तणावामुळे अनेक लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी असेल तर तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकता.

  • गोष्टी शेअर करा

जेव्हा तुम्ही कामामुळे तणावामध्ये असता तेव्हा मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर कराव्या. कारण मनातील गोष्टी शेअर केल्याने मन हलके होते आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही कुटूंबातील सदस्यांसोबत किंवा मित्रांसोबत गोष्टी शेअर करू शकता.

  • पोषक आहार

निरोगी आरोग्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे असते. कामामुळे अनेकवेळा खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे अनेक शारिरिक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही कामामुळे दुपारचे जेवण करू शकत नसाल तर सुकामेवा किंवा फळांचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

  • वेळेला महत्व द्या

कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी टाइमटेबल बनवणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही वेळेत काम पुर्ण करून वैयक्तिक आयुष्य आनंदाने जगू शकता.

  • ट्रिप प्लॅन करा

ऑफिसमधील कामाचा ताण कधीच कमी होत नाही. यामुळे कामातून विश्रांती घेऊन ट्रिप प्लॅन करावी. यामुळे कामाचा ताण कमी होऊन तुम्हाला फ्रेश वाटेल. यामुळे पुन्हा काम करताना नवा उत्साह राहतो.

  • योग करावा

योग केल्याने मन आणि डोक शांत राहते. तसेच अनेक आजार देखील दूर राहतात. नियमितपणे ध्यान, व्यायाम किंवा योग केल्याने ताण कमी होतो. यामुळे वर्क-लाईफ बॅलन्स साधण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : लासलगावातून थेट व्हिएतनामला मका!

SCROLL FOR NEXT