how to improve Self Confidence in kids
how to improve Self Confidence in kids Eskal
लाइफस्टाइल

मुलं १३ वर्षांची होण्यापूर्वी या १० गोष्टी त्यांना नक्की शिकवा, Self Confidence वाढून होतील आत्मनिर्भर

Kirti Wadkar

How to improve Self Confidence in kids: मुलांचा सांभाळ करत असताना केवळ त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा शालेय प्रगतीकडे लक्ष ठेवणं एवढचं नसून इतर अनेक गोष्टींकडे लक्ष देणं महत्वाचं असतं.

वाढत्या वयासोबतच त्यांना आयुष्यामध्ये Life तोंड द्याव्या लागणाऱ्या विविध परिस्थितीसाठी तयार करणं आणि त्यासाठी योग्य ते कौशल्य शिकवणं गरजेचं असतं.

या कौशल्यांमुळे Skills त्यांना आत्मनिर्भर बनण्यास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यात मदत करतात. त्यामुळे जीवनावश्यक ही कौशल्या मुलांना शिकवणं ही आई-वडिलांची जबाबदारी असते. How to Built Sefl Confidence in your Children

मुलांमध्ये Children प्रत्येक गोष्ट शिकण्याची किंवा आत्मसात करण्याची क्षमता अधिक असते. यासाठीच अगदी कमी वयापासूनच त्यांना विविध गोष्टी आणि प्रसंग हाताळण्याची संधी देण गरजेचं आहे. यासाठी भविष्यात त्यांना अडचणींना तोंड देणं कठीण होणार नाही.

यासाठीच मुलांना ते १३ वर्षांचे होण्यापूर्वीच आई-वडिलांनी काही कौशल्ये Skills शिकवणं गरजेचं आहे. ही कौशल्य कोणती हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

स्वच्छता- सर्वात पहिले मुलांना स्वच्छता आणि नीटनेटकेपणा शिकवा. याची सुरुवात तुम्ही त्यांच्या खोलीची सफाई किंवा त्यांच कपड्यांचं किंवा पुस्तकांचं कपाट स्वच्छ करायला लावण्यापासून करू शकता. सकाळी उठल्यानंतर स्वत:च अंथरुण उचलणं आणि खोली आवरणं त्यानंतरच इतर गोष्टी करणं याची त्याना सवय लावा.

कोणतही काम साधं समजू नये, प्रत्येक काम व्यवस्थित करावं अशा काही सवयी त्यांना लावा. 

प्रवास करणं- मुलांना शाळा आणि घरं यातील प्रवासाचा मार्ग दाखवून द्यावा. कशा प्रकारे ते सार्वजनिक वाहनांमधून घर ते शाळा ये जा करू शकतात हे त्यांना दाखवून द्या.

त्यांना बस, रिक्षा, मेट्रो किंवा टॅक्सी या पर्यायांची माहिती द्या. अर्थात सुरुवातीला तुम्ही त्यांच्यासोबत काही दिवस प्रवास करा. 

या प्रवासा दरम्यान त्यांना कोणती काळजी घ्यायची आहे हे देखील पटवून द्या. प्रवासाचा मार्ग दाखवून देत असताना कोणत्या अडचणी आल्यास काय करावं. सुरक्षेच्या काही टिप्स त्यांना द्या.

हे देखिल वाचा-

कुकिंग- अलिकडे कुकिंग खूपच सोप झालं आहे. यासाठी सुट्टीच्या दिवशी मुलांना सोबत घेऊन त्याना नाश्त्याचे काही सोपे पदार्थ सुरुवातीला शिकवा. मुलांसोबत चांगला मजा-मस्ती आणि हसत खेळत वेळ घालवण्याचा हा एक चांगला मार्ग देखील आहे. मुलं देखील कुंकिंग ऍन्जॉय करतील.

मुलांना तुम्ही काही ज्यूस, सॅण्डवीच, ऑमलेट, स्मूदी असे सोपे पदार्थ शिकवू शकता. त्यानंतर तुमच्या देखरेखीखाली ते त्यांच्याकडून बनवून घ्या. 

शॉपिंग- घरातील सामान भरताना तुम्ही त्यांनाही सोबत घेऊन जा. भाजीपाला किंवा इतर वस्तू खरेदी करताना कसे पैसे वाचवावे, पैशांचा हिशोब तसचं त्याचं महत्व त्यांच्या लक्षात येईल. सुरुवातीला तुम्ही त्याना दूध, बिस्किटं किंवा वह्या, पुस्तकांची खरेदी करण्यासाठी पाठवा. 

गृहपाठाची सवय- मुलांना स्वत: गृहपाठ पूर्ण करण्याची सवय लावा. तसचं एकाच वेळी अभ्यासाला पूर्ण वेळेत गृहपाठ पूर्ण करण्याची सवय लावा. तसचं चांगल्या प्रकारे गृहपाठ करण्यासाठी टिप्स द्या.

 मुलं त्यांचा गृहपाठ पूर्ण करत असताना तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट करत असताना ते कसे आखिव रेखीव असावे, हस्ताक्षर कसं सुधारावं यासाठी त्यांना मदत करा. 

महत्वाचे फोन नंबर- मुलांच्या आई-वडिलांसोबतच काही इतर महत्वाचे फोन नंबर लक्षात ठेवण्यास सांगा. वेळोवेळी ते नंबर त्यांच्या लक्षात आहेत ना हे तपासून पहा. एखाद्या कठिण काळी त्यांना या नंबरची मदत भासू शकते. तुम्ही आजी- अजोबा, किंवा कुटुंबातील काका, मामा यांचे नंबर त्यांना लक्षात ठेवण्यास सांगा. 

फर्स्ट एड- गरज भासल्यास ते स्वत:किंवा इतर कुणाची योग्य काळजी घेऊ शकतील यासाठी त्यांना प्राथमिक औषधोपचाराची माहिती द्या.

यात खास करुन जखम स्वच्छ करणं, मलममट्टी करणं त्यासाठी कोणती अँटीसेप्टिक क्रिम वापरावी हे शिकवा, त्यांना ताप आल्यावर कोणतं औषध घ्यायचं आहे हे सांगा. 

मनी मॅनेजमेंट- मुलांना लहानपणापासून पॉकेट मनी द्या आणि ते पैसै त्यांना साचवायला तसचं योग्य ठिकाणी कसे खर्च करावे हे शिकवा. त्यांना हिशोब आणि बचत करणं शिकवा. 

हे देखिल वाचा-

भावना व्यक्त करणं- मुलांनी त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं गरजेचं आहे. यासाठी त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना भावना व्यक्त करणं शिकवा.

यामुळे त्यांना समाजात वावरणंही सोप जाईल. तसचं त्यांना मित्र बनवताना अडचणी येणार नाहीत. त्याचं संवाद कौशल्य सुधारेल. 

तयार होणं- सकाळी शाळेत जाण्यापूर्वी स्वत: तयार होणं म्हणजेच वेळत उठणं, टॉयलेटला जाणं, आंघोळ, नाश्ता करणं, शाळेचा गणवेश घालणं. शाळेची बॅग भरणं तसचं बूट स्वच्छ करून घालणं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.

या काही सवयी तुम्ही मुलांना ते १३ वर्षांचे होण्यापूर्वी लावल्यास त्यांना पुढील काळात शिक्षण घेत असताना अडचणी येणार नाहीत.

शिवाय काही चांगल्या सवयी या आयुष्यभरासाठी तशाच राहतील आणि त्यांना कोणतही काम कठीण वाटणार नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT