Perfect Jeans Tips esakal
लाइफस्टाइल

Perfect Jeans Tips: जीन्स आवडते तर आहे पण फिट बसत नाही? परफेक्ट जीन्ससाठी या टिप्स निवडा

इतर कपडे फिट आहे की नाही हे तरी आपण सांगू शकतो पण जीन्स फिट आहे की नाही हे कसं ओळखायचं?

सकाळ डिजिटल टीम

Perfect Jeans Tips: ड्रेस कितीही आकर्षक असो, तो फिट बसला तरच आकर्षक वाटतो आणि आपणही त्यात जरा कम्फर्टेबल असतो. अनेकदा लोकांचं मत असतं की, आपण जेवढे ब्रॅंडेड आणि महागडे कपडे घेऊ ते तेवढे स्टायलिश आणि सुंदर असतात. 

पण ते खरंच आपल्याला फिट बसतात का? इतर कपडे फिट आहे की नाही हे तरी आपण सांगू शकतो पण जीन्स फिट आहे की नाही हे कसं ओळखायचं? 

जीन्स खरेदी करतांना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.. (How To Buy Perfect Jeans)

१. ऑफलाईन शॉपिंगला प्राधान्य द्या 

जीन्स खरेदी करतांना ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा ऑफलाईन खरेदी करा, म्हणजे तुम्हाला त्याच कापड कसं आहे? याचा अंदाज येईल शिवाय तुम्ही ती ट्राय करून बघू शकता. 

२. किमान ३ साइज ट्राय करा

जेव्हा ट्रायल रूममध्ये जाऊन जीन्स ट्राय करता आहात, तेव्हा सोबत आपली रेग्युलर साइजची जीन्स नेतांना एक लहान आणि एक मोठी साइज पण घेऊन जा, तिन्ही साइजपैकी जी जीन्स ट्राय केल्यावर तुमचा बॉडीशेप परफेक्ट दिसतो आहे ती निवडा.  

३. स्लीम फिट जीन्स ट्राय करा 

बुटकट, स्ट्रेट फिट या प्रकारांऐवजी जर तुम्ही स्लिम फिट जीन्स रोजच्या परिधानासाठी घेतली तर ती तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. ती जीन्स स्ट्रेचेबल असावी आणि फक्त तुमच्या साइजची असावी. या फिटमध्ये तुम्ही हाय राइज, मिड राइज किंवा लो राइज जीन्स निवडू शकता.

४. स्कीनी जीन्स नक्की घ्या

तुम्ही आजपर्यंत कधीही स्कीनी जीन्स ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा, ही जीन्स प्रत्येका साइजमध्ये उपलब्ध आहे. आपल्या शरीरानुसार ही छान दिसते. 

५. लेंथचा विचार असूदेत 

अनेकदा असं होतं की जीन्स आपण घेतो आणि मग लक्षात येतं की ती उंचीला खूप लहान किंवा मोठी आहे, जे खरंतर नको.. आपल्या जीन्सची लेंथ नक्की किती हवी आहे हे ठरवून जीन्स विकत घ्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT