Honey 
लाइफस्टाइल

Kitchen Tips : 'या' ५ पद्धतीने ओळखा भेसळयुक्त मध

तुम्ही वापरत असलेला मध भेसळयुक्त तर नाही ना?

शर्वरी जोशी

सध्याच्या काळात प्रत्येक जण फिटनेसकडे fitness लक्ष देऊ लागला आहे. त्यामुळे असंख्य फिटनेस फ्रिक लोक साखरेऐवजी मध honey आणि गुळ Jaggery या नैसर्गिक स्वीटनरला sweetener पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे लोकांची वाढती मागणी लक्षात घेता आता बाजारातसुद्धा अनेक ब्रँड व फ्लेवर्समध्ये मध मिळू लागला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ब्रँड पाहून मधाची खरेदी करतो. परंतु, आपण खरेदी केलेला मध शुद्ध आहे कि भेसळयुक्त हे तपासून पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणूनच, भेसळयुक्त मध कशा प्रकारे ओळखायचा ते पाहुयात. (how to differentiate between real and fake honey)

१. फिंगर टेस्ट -

मधाची शुद्धता तपासण्यासाठी किंचतसा मध अंगठा व तर्जनीमध्ये ( अंगठ्या बाजूचं बोट) घ्यावं आणि काही काळ हा मध दोन्ही बोटांनी घासावा. जर मध शुद्ध असेल तर तो बोटामध्ये जिरतो व बोटांना चिकटपणा जाणवत नाही. परंतु, मध अशुद्ध किंवा भेसळयुक्त असेल तर त्याचा चिकटपणा बोटांना जाणवतो. भेसळयुक्त मधात साखर मिक्स केली असते. त्यामुळे या साखरेच्या पाकाचा चिकटपणा राहतो.

२. क्रिस्टलायझेशन -

मध तयार होताना त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. परिणामी, मध घट्ट होऊन तो स्फटिक स्वरुपात बाटलीच्या तळाशी जाऊन बसतो. परंतु, भेसळयुक्त मध पातळ असतो. त्यामुळे तो तळाशी घट्ट स्वरुपात दिसून येत नाही.

३. वॉटर टेस्ट -

शुद्ध मध घट्ट असतो त्यामुळे तो पटकन पाण्यात विरघळत नाही. पाण्यात टाकल्यावर त्याची गोळी तयार होते. परंतु, मध भेसळयुक्त असेल तर तो लगेच पाण्यात विरघळून जातो. यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात १ चमचा मध घाला व पाणी ढवळा. जर मध तळाला जाऊन परत वर आला तर तो शुद्ध मध. आणि, मध पाण्यात विरघळला तर तो मध भेसळयुक्त आहे.

४. फायर टेस्ट -

प्रथम कापूस घेऊन तो मधामध्ये बुडवा आणि त्यानंतर पेटवण्याचा प्रयत्न करा. कोणताही आवाज न करता कापूस पेटला तर मध शुद्ध आहे. परंतु, कापूस पेटत असताना तडतड आवाज आला तर तो मध भेसळयुक्त आहे. शुद्ध मधात पाण्याचा अंश नसतो. त्यामुळे असा मध पेट घेताना आवाज येत नाही. मात्र, भेसळयुक्त मध असेल तर कापूस पेटताना तडतड आवाज येतो.

५. पेपर टेस्ट -

मध शुद्ध आहे की नाही ते तपासण्यासाठी मधाचे काही थेंब पेपरवर टाका. जर मध शुद्ध असेल तर पेपर भिजणार नाही. मात्र, भेसळयुक्त मध असेल तर पेपर लगेच भिजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Farmer : इमानदार श्वानांची धाडसी कहाणी! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे प्राण वाचले, कुत्र्यांनी हल्ला करताच बिबट्याने...

U19 IND vs PAK: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात रोखण्यात पाकड्यांना यश; पण आयुषच्या प्रहाराने झाले बेजार; चौकार- षटकारांची बरसात

Latest Marathi News Live Update: आपण सारे महाराष्ट्राची विचार करणारे लोक- देवेंद्र फडणवीस

Hacking Tips : तुमच्या मोबाईल स्क्रीनवर 3 रंगीत ठिपके बघितलेत का? फोन हॅक झालाय का पाहायचं असेल तर 'हे' एकदा चेक कराच

मनपा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर! राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात? आचारसंहिता होणार लागू

SCROLL FOR NEXT