Benefits of Tadasana esakal
लाइफस्टाइल

Benefits of Tadasana : उंची वाढवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे ताडासन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

Benefits of Tadasana : निरोगी आरोग्यासाठी आपण नियमितपणे योगा, व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Tadasana : निरोगी आरोग्यासाठी आपण नियमितपणे योगा, व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. जर या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखले तर आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. पौष्टिक संतुलित आहाराच्या जोडीला दररोज योगासनांचा सराव केल्याने आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहते.

योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो. ही योगासने दररोज केल्याने शरीराच्या विविध समस्या दूर करण्यासाठी मदत होते. या योगासनांपैकी एक असलेले योगासन म्हणजे ताडासन होय.

ताडासनामध्ये आपल्या शरीराची स्थिती ही उंच डोंगरासारखी असते. ताडासनाचा सराव योग्य पद्धतीने केला तर आपल्या शरीरासाठी ते प्रभावी आणि फायदेशीर ठरते. आज आपण ताडासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

ताडासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • या योगासनाचा सराव करताना सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा. तुमच्या दोन्ही हातांची बोटे आणि पंजे खुले ठेवा.

  • आता दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडून डोक्यावर घ्या. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही हात कानाजवळून जायला हवेत.

  • आता तुमच्या दोन्ही हातांची बोटे आणि शरीर वरच्या दिशेने खेचा. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही पाय उचलू नका ते स्थिर ठेवा.

  • आता तुमच्या संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

  • या शरीराच्या स्ट्रेचसोबत श्वास घेत रहा आणि काही सेकंद याच स्थितीमध्ये राहा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही हात हळूहळू खाली न्या आणि सामान्य स्थितीमध्ये या.

  • तुमच्या शरीराला स्ट्रेच करण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे.

  • शिवाय, हे योगासन तुम्ही दिवसातून २-३ वेळा करू शकता.

ताडासन करण्याचे फायदे :

  • या योगासनाचा नियमित सराव केल्याने शारिरीक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.

  • उंची वाढवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. त्यामुळे, लहान मुलांना या योगासनाचा दररोज सराव करायला लावा.

  • ताडासनाचा नियमित सराव केल्याने शरीर टोन होण्यास मदत होते.

  • पाठीचा कणा ताठ होऊन पाठदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.

  • या योगासनाचा नियमित सराव केल्याने सायटिकाच्या समस्येपासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT