skin care sakal
लाइफस्टाइल

मेकअप न करता होणार तुमचे गाल गुलाबी! कसे, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

गालावर नैसर्गिकरित्या गुलाबी रंग येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला बाजारातून महागडे कॉस्मेटीक खरेदी करण्याचीही गरज देखील पडणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या घरात असे अनेक खाद्यपदार्थ असतात, ज्यामुळे तुमच्या गालावर नैसर्गिकरित्या गुलाबी रंग येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला बाजारातून महागडे कॉस्मेटीक खरेदी करण्याचीही गरज देखील पडणार नाही. कोणतीही लाली पावडर न लावता तुमचे गाल गुलाबी दिसु लागतील. रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा त्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या गुलाबी होईल.

चमकदार त्वचा, लाल ओठ आणि गुलाबी गाल आपले असावे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते, परंतु अनेकदा बिना मेकअपशिवाय गुलाबी त्वचा मिळूच शकत नाही.पण तुम्ही जर का तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्याने तुमचे शरीर आतून चांगले होईल, ज्याचा परिणाम तुमच्या बाह्य त्वचेवरही आपोआप दिसून येईल.

आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील सगळे डाग निघून जातील अन तुमच्या गालावर आपोआप गुलाबीपणा येईल. गुलाबी गाल मिळवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया.

1) टोमॅटो

टोमॅटो जशी जेवणाची चव वाढवतो तसाच तो त्वचेसाठीही खूप चांगला आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, बी3, बी5, बी7 आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.

टोमॅटो त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट आहे, त्यात असलेले अँटिऑक्सिडेंट लाइकोपीन यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तरुणपणा टिकून राहण्यास मदत होते. टोमॅटो हे तुम्ही थेट चेहऱ्यावरही लावू शकता.

2) बीट

बीटाचा लाल रंग तुमच्या गालावर नैसर्गिक लाली म्हणून काम करतो. बीट खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. त्याचवेळी, त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म हे चेहऱ्यावर मुरुम येण्यापासून रोखतात. रक्त स्वच्छ करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी एक ग्लास बीटाचा रस दररोज प्यावा. त्यामुळे तुमची त्वचा चमकेल.

3) अ‍ॅव्होकाड सॅलड

तुम्ही अ‍ॅव्होकाडो सँडविच बनवून ते तुम्ही संत्र्याच्या ज्युस सोबत खाऊ शकता. अ‍ॅव्होकाडोमुळे त्वचा मऊ होते आणि अ‍ॅव्होकाडोहे तुमच्या त्वचेला हायड्रेटेड ठेवते. त्याचबरोबर संत्र्यापासून त्वचेला व्हिटॅमिन सी मिळते.

4)भोपळ्याच्या बिया

अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि सी आणि इतर खनिजांनी समृद्ध भोपळा त्वचेच्या पेशी बनवण्यासोबतच चेहऱ्याच्या तेलावरही नियंत्रण ठेवतो. त्यामुळे त्वचेवरील मोकळे छिद्रही कमी होतात. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल आणि त्वचाही चमकदार होईल.

5) फेस पॅक
तुमचे गाल गुलाबी होण्यासाठी तुम्ही फेस पॅक तयार करू शकता. ३ चमचे भोपळ्याची पेस्ट घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध आणि एक चमचा दूध मिसळून चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवा. लगेच तुम्हाला फरक दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT