Monsoon Tips sakal
लाइफस्टाइल

Monsoon Tips: पावसाळ्यात ट्यूब लाईटवर भिरभिरतात माशा? मग फॉलो करा या टिप्स

अनेकदा पावसाळ्यात घरातील प्रकाश दिव्यांवर माशा, किडे भिरभिरतात.

Aishwarya Musale

यावेळी देशाच्या जवळपास सर्वच भागात पावसाळा सुरू आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो, पण अनेकदा पावसाळ्यात घरातील प्रकाश दिव्यांवर माशा, किडे भिरभिरतात.

एखादी लाईट घरात सुरु असली तर त्याच्यावर अनेक पाखरं येऊन बसतात. अनेक उपाय करूनही ते जाण्याचं नाव घेत नाही आणि त्यांना मारणं देखील योग्य वाटतं नाही. पावसाळ्यात तेव्हा तुम्ही अशा काही ट्रिक्स करू शकता जेणेकरून या माशा काही मिनिटातच निघून जातील.

बेकिंग सोडा वापरा

तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी, कपड्यांवरील डाग साफ करण्यासाठी, फरशा साफ करण्यासाठी किंवा बागेपासून किडे दूर ठेवण्यासाठी एकदा नव्हे तर अनेक वेळा बेकिंग सोडा वापरला असेल.

  • सर्व प्रथम, एक कप पाण्यात 2-3 चमचे बेकिंग सोडा टाका आणि ते चांगले मिसळा.

  • आता त्यात १ चमचा मीठ किंवा १ चमचा लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा.

  • यानंतर हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून ठेवा.

  • आता ज्या ठिकाणी बल्ब किंवा ट्यूबलाइट लावले आहे त्या ठिकाणी आणि भिंतीवर फवारणी करा.

लॅव्हेंडर तेल वापरा

जर तुम्हाला घराचा वास चांगला ठेवायचा असेल तसेच पावसाळ्यात किडे, मुंग्यांना दूर ठेवायचे असेल तर लॅव्हेंडर तेल वापरणे हा उत्तम उपाय ठरू शकतो. याचा वापर केल्याने पावसाळ्यात येणारा दुर्गंधीही निघून जाईल.

  • सर्व प्रथम, 3-4 कप पाण्यात 1/2 चमचे लॅव्हेंडर तेल घाला आणि चांगले मिसळा.

  • आता ते एका स्प्रे बाटलीत भरून लाईटच्याभोवती चांगले शिंपडा.

दार खिडक्या बंद करा

दिवे लावण्यापूर्वी संध्याकाळी तुम्ही दार खिडक्या लावून घ्या. घरात शिरण्याचे सर्व मार्ग बंद असल्याने किडक घरत प्रवेश करणार नाहीत.

घर ठेवा स्वच्छ

घराची पावसाळ्यात साफसफाई करण्यासोबतच, खिडकी-दारे, ट्यूबलाइट, बल्ब यांची साफसफाई करत रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT