Skin Care sakal
लाइफस्टाइल

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचंय? मग हे स्किन केअर रुटीन करा फॉलो

अनेकांच्या वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर, शरीरात बदल दिसू लागतात.

Aishwarya Musale

वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वृद्धत्वासह, त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसतात. वाढत्या वयानुसार त्वचेची एलास्टिसिटी कमी होऊ लागते आणि सुरकुत्या वाढू लागतात. अनेकांची त्वचा वयाच्या आधीच वृद्धत्वाची शिकार बनते, तर काही लोकांचे वय वाढले तरी ते त्यांच्या वयापेक्षा खूपच तरुण दिसतात.

याचे कारण त्यांचा आहार, जीवनशैली आणि त्वचेची काळजी घेण्याची पद्धत असू शकते. तुम्हीही वयाच्या ४० व्या वर्षी प्रवेश करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही तरुण दिसू शकता.

फोटोएजिंग- अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजिस्टच्या मते, जेव्हा सूर्याचे यूव्ही किरण त्वचेवर पडतात तेव्हा फोटोएजिंगची समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत दुपारच्या उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा, त्वचा झाकून ठेवा, सनग्लासेस वापरा आणि बाहेर जाण्यापूर्वी एसपीएफ वापरा.

रोज मॉइश्चरायझर लावा - जसजशी आपली त्वचा मेच्‍योर होते तसतसे तिची आर्द्रता नाहीशी होते ज्यामुळे सुरकुत्या तयार होतात. त्यामुळे रोज चांगल्या क्‍वालिटीचे मॉइश्चरायझर वापरा आणि कोरडेपणापासून स्वतःचा बचाव करा.

त्वचा स्वच्छ करणे - दिवसातून दोनदा त्वचा स्वच्छ करा. यासाठी गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करा, साबणाऐवजी माइल्‍ड साबण वापरा. स्क्रबिंगपासून त्वचेचे संरक्षण करा.

धुम्रपान टाळा- जर तुम्ही तंबाखूचे सेवन करत असाल तर त्यातील विषारी पदार्थ त्वचेला हानी पोहोचवण्याचे काम करतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्याही पडतात.

निरोगी आहार घ्या- तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, लीन प्रोटीन्स, हेल्दी फॅट इ. हे तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी काम करेल.

पुरेशी झोप घ्या- दिवसभर काम केल्यानंतर रात्री पुरेशी झोप घेणेही खूप गरजेचे आहे. यावेळी शरीर ताजेतवाने आणि बरे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT