Career Tips esakal
लाइफस्टाइल

Career Tips : ऑफिसमध्ये कामाचे प्रेशर आहे? मग फॉलो करा 'या' टिप्स

आफिसमध्ये काम करत असताना, तुम्हाला वैयक्तिक आयुष्यातही योग्य समतोल राखता आला पाहिजे.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : चांगले करिअर घडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. चांगले शिक्षण घेऊन जॉबला लागतो. त्यानंतर खर तर आपल्या करिअरची परीक्षा सुरू होते, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

जॉबला लागल्यानंतर आपण तिथे काम कसे करतो ? हे सर्वात महत्वाचे असते. तुमच्या कामाचा परफॉर्मन्स कसा आहे? याची वरिष्ठांकडून तपासणी केली जाते. तुम्हाला नवीन गोष्टी शिकायल्या मिळतात, अनुभव मिळतो.

हे सर्व घडत असताना करिअर, जॉबसोबत तुमच्या आयुष्यासोबत समतोल राखणे हे महत्वाचे आहे. वर्कलाईफ सोबत हा समतोल सांभाळणं गरजेचे आहे आणि प्रत्येकालाच हे जमते असे नाही. आफिसमध्ये काम करताना असाईनमेंट्स वेळेवर पूर्ण करण्यासोबत तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही योग्य समतोल आणि संतुलन राखता आले पाहिजे.

कामाचे प्रेशर हॅंडल करताना अनेकदा आपली चिडचिड होते. अशावेळी मग काहींना डिप्रेशन येते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही ऑफिसमधील कामाचे प्रेशर चांगल्य प्रकारे हॅंडल करू शकालं.

कामाचे प्रेशर कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

कामाचे प्लॅनिंग

तुम्हाला ऑफिसमध्ये दिवसभर काय काम असणार आहे ? कोणत्या प्रकारचे काम असणार आहे ? याची तुम्हाला कल्पना असणे महत्वाचे आहे. मग, त्याप्रमाणे याचे सर्व प्लनिंग सकाळीच करा. या प्लॅनिंगमुळे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टची आणि त्याच्याशी संबंधित अपडेट्सची माहिती असेल. शिवाय, तुमचे काम तुम्ही वेळेत पूर्ण करू शकालं.

ब्रेक घ्या

अनेकदा आपण जास्त काम करत असताना त्यात एवढे मग्न होऊन जातो, की आपण ब्रेक घेणं ही विसरून जातो. या स्थितीमध्ये दुपारचे जेवण किंवा स्नॅक्स देखील आपण जागेवर बसून खातो.

खरं तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. त्यामुळे, तुम्ही कामामध्ये किती ही व्यस्त असलात तरी कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घ्या आणि ऑफिस एरियामध्ये एखादी चक्कर मारा, यामुळे तुम्हाला फ्रेश ही वाटेल.

आत्मविश्वास महत्वाचा

कोणत्याही प्रकारचे काम करत असताना तुमचा स्वत:वर विश्वास असणे महत्वाचे आहे. कोणतीही परिस्थिती असुद्या तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. सकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

कामाचे प्रेशर वाढले किंवा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम असेल तर तुमच्या सहकाऱ्यांशी बोला किंवा तुमच्या वरिष्ठांसोबत बोला. ते यावर नक्कीच मार्ग सुचवतील. या सगळ्यांच्या मदतीने काहीतरी मार्ग निघेल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स देऊ शकालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT