How To Impress Others esakal
लाइफस्टाइल

How To Impress Others : तुम्हालाही इतरांचं फव्हरेट बनायचंय? मग फॉलोकरा 'या' टिप्स

आपल्या आजुबाजूच्या लोकांना आपण आवडावे ही प्रत्येकातच असणारी स्वाभाविक आणि सुप्त इच्छा असते.

सकाळ डिजिटल टीम

How To Impress Others : फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट असं आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतं. कुठेतरी त्याच पद्धतीने आपण आपलं इंप्रेशन कसं प्रभावी आणि चांगलं असेल याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आजुबाजूच्या लोकांना आपण आवडावे ही प्रत्येकातच असणारी स्वाभाविक आणि सुप्त इच्छा असते. पण प्रत्येकालाच ते जमते असे नाही. अशावेळी काय करावं, आपलाही इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी काय करावं असा प्रश्न पडतो. जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे.

प्रत्येकालाच वाटतं की, जेव्हा आपण कोणाला भेटू तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण आवडावे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की, समोरच्या व्यक्तीने आपल्याला पसंत करावं तर काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

तज्ज्ञ सांगतात की, इतरांनी आपल्याला पसंत करणं, सन्मान करणं खास करू ज्या व्यक्ती आपल्याला जवळच्या वाटतात त्यांच्याकडून असा प्रतिसाद मिळणं तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवणारं असतं.

कॉमन टॉपिक

जर तुम्हाला वाटतं की, ज्या व्यक्तीला तुम्ही भेटत आहात त्याने तुम्हाला पसंत करावं असं वाटत असेल तर तुम्हा दोघांसाठी कोणते विषय कॉमन आहेत ते ओळखा, आणि त्यावर तुमचं मत व्यक्त करा.

कम्युनिकेशन स्कील

समोरचा तुमच्याविषयीचं मत हे तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर बनवतो. त्यामुळे जर कोणाला इंप्रेस करायचं असेल तर पहिले तुमचं कम्युनिकेशन स्कील सुधारा. त्यावर थोडं काम करा. आपण कसं बोलतो यावरून लोक आपल्याविषयी मत बनवतात.

इन्व्हॉल्वमेंट

जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत असतो तेव्हा त्याच्या बोलण्यातही इंटरेस्ट घेणं गरजेचं आहे. समोरचा बोलत असताना तुमच्या बॉडीलँग्वेजमधून तुम्हाला त्याच्या बोलण्याशी काही देणं-घेणं नाही असं वाटायला नको. कोणीतरी तुमच्याशी बोलतंय आणि तुम्ही फोन बघताय असं वागाल तर इंप्रेशन डाऊन होईल.

मदत

काही लोक असतात ज्यांना इतरांकडून मदत मागण्याची लाज वाटते. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही स्वतःहून त्यांना मदत करायला आणि मदत मागायला मागेपुढे पाहू नका. त्यामुळे तुमच्यातले बाँडींग वाढेल.

दुसऱ्यांचही ऐकून घ्या

जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा फक्त स्वतःविषयीच बोलत राहीलेलं कोणाला फारसं आवडत नाही. समोरच्या विषयीही जाणून घ्या. त्यांना बोलण्याची संधी द्या आणि त्यांच बोलणं लक्ष देऊन ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT