लाइफस्टाइल

Kitchen Hacks : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खराब होण्याचे टेन्शन सोडा; ताज्या ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

हिरव्या पालेभाज्या दीर्घकाळ कशा साठवायच्या याच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

Aishwarya Musale

तुमच्या घराच्या रेफ्रिजरेटरमध्ये काय-काय साठवले जाते? फळे, भाज्या, रात्रीचे उरलेले जेवण आणि दोन-तीन दुधाच्या पिशव्या. भारतीय घरांमध्ये फ्रीजमध्ये ज्या प्रकारे वस्तू ठेवल्या जातात त्यावरून हे स्पष्ट होते की फ्रीज कितीही मोठा असला तरी तो ओव्हरलोड झालेला दिसेल.

आता फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर, हिवाळ्यात भरपूर हिरव्या पालेभाज्या असतात आणि आपण त्या अशाच फ्रीजमध्ये ठेवतो. आता समस्या अशी आहे की रेफ्रिजरेटरमध्येही हिरव्या भाज्या सडू लागतात आणि त्यांची पाने कोमेजतात.

जर तुम्हाला भाजीपाला स्टोर करण्यात अडचण येत असेल, तर मग तुम्ही काही उपाय करू शकता ज्याच्या मदतीने भाज्या सहज साठवता येतील.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फ्रिजमध्ये ठेवल्यास कांदे, बटाटे, लसूण आणि टोमॅटोची चव खराब होते.

फ्रिजमध्ये कोथिंबीर ठेवण्याचा उत्तम मार्ग

कोथिंबीर धुतली तर त्याची पाने कोमेजायला लागतात. म्हणून, त्याची मुळे कापून ती रेफ्रिजरेटरमध्ये एयरटाइट डब्यात ठेवणे हा स्टोर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

कोथिंबीरीच्या मुळांमध्ये ओलावा असतो आणि जर तुम्हाला मुळे न कापता कोथिंबीर वापरायची असेल तर त्याची मुळे एका ग्लास पाण्यात बुडवून रूम टेम्परेचमध्ये ठेवा. लक्षात ठेवा रेफ्रिजरेटरमध्ये ही पाण्याची युक्ती वापरू नका, अन्यथा रेफ्रिजरेटरच्या थंडीमुळे कोथिंबीरीची पाने कोमेजून जातात आणि त्याची चव देखील निघून जाईल.

हिरव्या पालेभाज्या धुतल्यानंतर त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका

तुम्ही हिरव्या पालेभाज्या विकत घेतल्या तरी त्या लवकर सुकायला लागतात. त्यात मातीही भरपूर असते आणि त्यामुळे अनेकजण धुतल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतात, पण हीच सर्वात मोठी चूक आहे.

तुम्ही त्यांना न धुता रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे आणि जेव्हा तुम्ही ते वापरणार असाल तेव्हाच त्यांना पाण्यात ठेवावे. पाण्यात टाकताच पाने ओलावा शोषून घेतात,

हिरव्या पालेभाज्या साठवण्याचा उत्तम उपाय...

मेथीच्या पानांची देठ काढून त्यानंतर न धुता कागदी पिशवीत गुंडाळून ठेवा. ही पानं वर्तमानपत्रात ठेवू नका, मेथी पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि झिप लॉक बॅगमध्ये ठेवा.

फ्रिजमध्ये हिरव्या भाजा ठेवायला जागा नसेल तर पालक उकळवून त्याची पेस्ट बनवू शकता. याच्या मदतीने तुम्ही पालक सूप, पालक-पनीर, बटाटा-पालक असे अनेक पदार्थ बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT