Belly Fat Sakal
लाइफस्टाइल

Yoga For Belly Fat Loss : ढेरी कमी करण्यासाठी करा केवळ हे एकच आसन, मिळतील अगणित लाभ

Belly Fat Loss Exercises At Home पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपल्या वर्कआऊट रूटीनमध्ये केवळ या एका आसनाचा समावेश करा आणि स्वतःच अनुभवा आश्चर्यकारक फायदे.

सकाळ डिजिटल टीम

तुमचेही पोट खूप सुटले आहे का? वाढलेल्या पोटामुळे तुम्हाला वाकताना, बसताना, उठताना, पायऱ्या उतरताना समस्यांचा सामना करावा लागतोय का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असे असेल तर मग शरीराचे वाढलेले वजन वेळीच कमी करणे तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. लठ्ठपणा म्हणजे अनेक शारीरिक समस्यांना आयते आमंत्रण.

म्हणूनच वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. या लेखाद्वारे आपण साध्यासोप्या आसनाची माहिती जाणून घेणार आहोत. या योगासनाचा आपण वर्कआऊट रूटीनमध्ये समावेश केल्यास मोठ्या प्रमाणात लाभ मिळतील. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करायचे ठरवलेच असेल तर मग हा लेख पूर्ण वाचावा.

बेली फॅट कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आसन

लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोग, स्ट्रोक, उच्च रक्तदाब आणि कॅन्सर यासारख्या आजारांना बळी पडण्याची शक्यता निर्माण होते.  हे धोके टाळण्यासाठी नियमित योगाभ्यास केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. योगासनांमुळे केवळ वजन कमी होण्यास नव्हे तर शारीरिक व मानसिक आरोग्याशी संबंधित कित्येक समस्या कमी होऊ शकतात.

जर इतके आरोग्यदायी फायदे मिळणार असतील तर मग वाट कसली पाहताय? आपल्या वर्कआऊट रूटीनमध्ये केवळ या एका आसनाचा समावेश करा आणि कित्येक अगणित लाभ मिळतात, याचा स्वतःच अनुभव घ्या.

पादहस्तासन

दोन्ही हात जमिनीवर पायांजवळ ठेवून हे आसन केले जाते, म्हणून यास पादहस्तासन असे म्हटले जाते. पादहस्तासनचा नियमित अभ्यास केल्यास पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.  

कसे करावे आसन ?

  • योग मॅटवर पायांमध्ये अंतर न ठेवता सरळ उभे राहा आणि हात देखील सरळ रेषेत ठेवा.

  • आता श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत हात वरील बाजूस उचला.

  • यानंतर लयबद्ध पद्धतीने खालील बाजूस वाका आणि दोन्ही हाताचे पंजे पायांजवळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा.

  • सोबतच आपल्या कपाळाने गुडघ्यांना स्पर्श करण्याचाही प्रयत्न करावा.

  • या सर्व प्रक्रिया करताना श्वास रोखून धरू नये. तसंच पाय गुडघ्यांमध्ये मोडता कामा नये.

  • आपल्या क्षमतेनुसार काही सेकंद पादहस्तासनाच्या अंतिम स्थितीत राहावे.

  • यानंतर ज्या क्रमाने या अंतिम स्थितीत पोहोचलात, त्याच उलट क्रमाने आसनातून बाहेर यावे. तीन ते चार वेळा या आसनाचा सराव करावा.

पादहस्तासनामुळे मिळणारे लाभ

  • पाठ, नितंब आणि मांड्यांचे स्नायू ताणले जातात, यामुळे हे अवयव मजबूत होऊ शकतात.

  • डोकेदुखी, झोप न येणे यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. मानसिक तणाव कमी होतो.

  • पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. ज्यामुळे गॅस, असिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात.

हे आसन करणे कोणी टाळावे?

  • मेरूदंड, मानेशी संबंधित दुखापत झाली असल्यास पादहस्तासन करणे टाळावे.

  • हृदयाशी संबंधित एखादी समस्या, हर्निया किंवा पोटाच्या आतील भागात सूज आली असल्यास आसन करणे टाळावे

  • गर्भवतींनी हे आसन करू नये.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT