Coffee  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Popular Coffee Methods: स्टारबक्स अन् सीसीडी कॉफीचा घ्या घर बसल्या आस्वाद

Popular Coffee Methods: ही खास ट्रिक वापरुन तुम्ही घरची बनवू शकता परफेक्ट कॉफी

सकाळ डिजिटल टीम

Morning Coffee: कॉफीचा एक कप दिवसभर मूड फ्रेश ठेऊ शकतो. चांगल्या आणि उत्तम कॉफीसाठी, बरेचदा लोक घरी कॉफी बनवण्याचा प्रयत्न करतात. कॉफीचे (Coffee) नाव घेताच मनात जी दोन नावे येतात ती म्हणजे 'सीसीडी' आणि 'स्टारबक्स'. पण त्यांच्यासारखी कॉफी घरी बनवणे शक्य नाही. तुमचेही कॉफीवर प्रेम असेल तर आम्ही तुमच्यासाठी CCD आणि Starbucks सारखी कॉफी बनवण्याच्या टिप्स घेऊन आलो आहोत. यामुळे तुम्ही घरात बसून 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात सीसीडी कॉफी बनवू शकता.

  • कॉफी बीया घरीच बारिक करा

कॉफी बनवण्यासाठी पहिले कॉफी बीया चांगले बारीक करून घ्या. जेव्हा तुम्ही कॉफी बनवाल तेव्हा ती पूर्णपणे ताजी कॉफी असेल. बीया बारीक करताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. बीया थोड्या जाडसर बारिक कराव्या. कॉफीच्या बीया घरच्या घरी बारीक करून बनवल्या तर कॉफीची टेस्ट वेगळी असेल.

  • चांगली कॉफी बनवण्यासाठी दूध नाही तर पाणी करा मिक्स

तुम्हाला माहित आहे का की सुमारे 98.5% तयार कॉफी फक्त पाण्यात बनवली जाते? याचा अर्थ कॉफीची चव वाढवण्यात पाण्याचा (Water) मोठा वाटा आहे. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कॉफी बनवत असतांना पाणी स्वच्छ वापरावे. नाहीतर तुमच्या कॉफीची टेस्ट खराब होऊ शकते.

  • सीसीडी (CCD) कॉफी कशी बनवायची

जर तुम्हाला खूप कडक आणि टेस्टी कॉफी प्यायची असेल, तर पाण्याचे तापमान 92-95 डिग्री सेल्सिअस असावे. तरच तुमच्या कॉफीला CCD सारखी चव येईल.

  • व्हिनेगरने कॉफी मेकर स्वच्छ करा

कॉफी मशीन नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. जर कॉफी मशीन खराब असेल तर कॉफीची चव देखिल खराब होते. जेव्हा तुम्ही कॉफी मेकर वापरता तेव्हा मशीनची घाण नेहमी स्वच्छ करावी. कॉफी बनवतांना ग्राइंडर दर आठवड्याला स्वच्छ करावे. महिन्यातून किमान एकदा, कॉफी मशीन व्हिनेगरने स्वच्छ करावे, जेणेकरून त्यात कोणताही वास राहणार नाही. प्रत्येक वेळी कॉफी बनवतांना मशीन स्वच्छ धुवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

SCROLL FOR NEXT