how to make dish mukesh ambani favourite dish gujarati panki  
लाइफस्टाइल

Mukesh Ambani Favourite Dish: गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानींना आवडते 'पंकी ', हे नक्की आहे तरी काय?

गुजराती पदार्थांना भारतीय खाद्यसंस्कृती विशेष स्थान आहे. गुजरात राज्य म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ते ढोकळा आणि थेपला, खांडवी, फाफडा. पण असा एक पदार्थ आहे जो गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानींना फार आवडतो.

सकाळ डिजिटल टीम

भारतात विविध संस्कृती आणि परंपरा एकत्र नांदतात. प्रत्येक ठिकाणची बोलीभाषा, राहणीमान, खानपानाची पद्धत वेगवेगळी आहे. अश्या या विविधतेने नटलेल्या देशाची खाद्यसंस्कृतीही मोठी आहे. त्यामुळं भारताला खवय्यांचा देश असंही म्हटलं जातं. भारतात खाद्य सांस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतामध्ये विविध राज्यांमधील चविष्ठ पदार्थांवर ताव मारण्यासाठी परदेशातील लोक येत असतात. (how to make dish mukesh ambani favourite dish gujarati panki )

गुजराती पदार्थांना भारतीय खाद्यसंस्कृती विशेष स्थान आहे. गुजरात राज्य म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ते ढोकळा आणि थेपला, खांडवी, फाफडा. पण असा एक पदार्थ आहे जो गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानींना फार आवडतो. तर त्या पदार्थांचं नाव पांकी असं आहे.

काही दिवसांपूर्वी निता अंबानी मुलाच्या लग्नाची पत्रिका महादेवाच्या चरणी वाहन्यासाठी काशी विश्वनाथला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी तेथिल प्रसिद्ध चाटची चव चाखली. पण यासोबतच त्यांनी माध्यमांशी बोलताना मुकेश अंबानी यांच्या आवडीचा पदार्थ कोणता? याचे नाव सांगितलं.

तर मुकेश अंबानी यांना गुजराती पंकी हा पदार्थ खुप आवडतो. हे तांदळाच्या पिठाच्या पिठापासून बनवले जाते, ज्यामध्ये चीजचा वापर अधिक केला जातो. हा पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून मेथी आणि हळद घालून मसालेदार तयार केला जातो. हे लोणच्याबरोबर किंवा चटणीसोबत सर्व केले जाते.

तर जाणून घेऊयात पंकी नेमकी आहे तरी काय आणि कशी बनवायची?

ढोकळ्याप्रमाणे हा पदार्थ आहे ज्याला तेलाची गरज भासत नाही. त्यामुळे हा पदार्थ आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. नाश्त्यावेळी देखील या पदार्थाची चव चाखता येते.

पंकी बनवण्यासाठी साहित्य

एक कप तांदळाचे पीठ

दही दोन चमचे

बारीक चिरलेली कोथिंबिर

हिरवी मिरची

हळद

चवीनुसार मीठ

आलं- लसुण पेस्ट

दोन चम्मच तेल

केळाचे पान

हिंग चिमुटभर

ईनो

पाणी

कृती

एका खोलगट भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात दही, धने, हिरवी मिरची, हळद, मीठ, आले लसूण पेस्ट, तेल या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. या सर्व गोष्टी तांदळाच्या पिठात एकजीव झाल्यावर त्यात हिंग आणि ईनो घालून मिक्स करा. आता यामध्ये थोडं घाला. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. हे बेटर खूप पातळ करा.

केळीच्या पानांचे चार तुकडे करा. त्यानंतर केळीच्या पानावर तेल लावून घ्या. आता गॅसवर पॅन ठेवा. तो चांगला गरम झाल्यावर त्यावर हे केळीचं पान ठेवा अन् तयार केलेलं मिश्रण ओता. हे मिश्रण केळीच्या संपूर्ण पानावर समान रीतीने पसरवा. नंतर दुसऱ्या केळीच्या पानाने चांगले झाकून ठेवा.

एक मिनिट मध्यम आचेवर शिजू द्या. ते हळूवारपणे उलटा आणि दुसरी बाजू दोन मिनिटे शिजवा. जेव्हा केळीच्या पानांवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात आणि तांदळाचे हे मिश्रण पानांपासून वेगळं होताना दिसतं तेव्हा समजावे की ते शिजण्यास सुरुवात झाली आहे. जोपर्यंत मिश्रण केळीच्या पानांपासून वेगळं होत नाही तोपर्यंत हे दोन्ही बाजूंनी शिजू द्या. आता ते एका प्लेटमध्ये काढा आणि केळीची पाने वेगळी करा. तुमची गुजराती डिश पंकी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT