Homemade Face Scrubs Sakal
लाइफस्टाइल

Homemade Face Scrubs : साखर किंवा कॉफी नव्हे तर या 4 गोष्टींपासून तयार करा स्क्रब, चेहऱ्याची त्वचा होईल नितळ व स्वच्छ

Face Scrubs : घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या कित्येक पदार्थांपासून फेस स्क्रब तयार केले जाऊ शकते. नैसर्गिक पदार्थांमधील औषध गुणधर्मांमुळे चेहऱ्याच्या त्वचेला पोषकतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते.

सकाळ डिजिटल टीम

Skin Care News : चेहऱ्याच्या त्वचेवरील घाण काढण्यासाठी, त्वचेवरील मृत पेशींच्या समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावर चमक मिळवण्याकरिता एक्सफोलिएशन ट्रीटमेंट (homemade exfoliation treatment in marathi) करणे फायदेशीर ठरेल. 

यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही तर आपण स्वयंपाकघरात सहजरित्या आढळणाऱ्या पदार्थांपासून घरच्या घरी नॅचरल फेस स्क्रब (Homemade Face Scrub In Marathi) तयार करू शकता. घरगुती स्क्रबमुळे त्वचेला खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. महत्त्वाचे म्हणजे या स्क्रबमध्ये साखर किंवा कॉफी पावडरचा वापर करणे कटाक्षाने टाळावे.  

चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या दूर करण्यासाठी स्क्रब (Natural Scrubs To Remove Dead Skin Cells) 

टोमॅटो स्क्रब

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असल्यास टोमॅटो स्क्रबचा वापर केला जाऊ शकते. स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा टोमॅटो घ्यावा व तो बारीक चिरावा. यानंतर चिरलेला टोमॅटो मॅश करा व चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने स्क्रब करावे. थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

ओटमील स्क्रब 

ओटमीलचे स्क्रब (Oatmeal Scrub) तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये ओटमीलची पावडर घ्यावी. त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करावे. दोन्ही सामग्री व्यवस्थित मिक्स करा. स्क्रब तयार झाल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याच्या त्वचेवर लावा व स्क्रब करावे. काही मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

बेसन स्क्रब

चेहऱ्याच्या त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्तता हवी असेल तर स्किन केअर रूटीनमध्ये बेसन स्क्रबचा समावेश करावा. अर्धा चमचा दही आणि एक चमचा बेसन एकत्रित करून स्क्रब तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर चोळावे व काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. 

पपई स्क्रब 

चेहऱ्याच्या त्वचेवर घाणीचा थर साचला असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी आपण पपई स्क्रबचा वापर करू शकता. स्क्रब तयार करण्यासाठी पपईचा एक छोटा तुकडा घेऊन मॅश करावा. हवे असल्यास यामध्ये बेसनही मिक्स करा. स्क्रब तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. काही वेळानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे टॅनिंगची समस्याही दूर होऊ शकते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT