hair sakal
लाइफस्टाइल

Hair Care: केस पांढरे व्हायला लागलेत? 4 घरगुती उपाय, केस राहतील काळेभोर

आजकालच्या जीवनशैलीत केस लवकर पांढरे होणे खूप सामान्य आहे.

Aishwarya Musale

आजकालच्या जीवनशैलीत केस लवकर पांढरे होणे खूप सामान्य आहे, परंतु ही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा लोकांचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागतात. बऱ्याच वेळा लोकांना याचे नेमके कारण समजत नाही, जे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून ही समस्या वेळीच सोडवता येईल.

जेव्हा हेयर पिग्मेंटेशन कमी होऊ लागते, तेव्हा मुलांच्या केसांचा काळा रंग पांढरा होऊ लागतो, यामागे केवळ जीवनसत्त्वेच नाही तर इतरही अनेक कारणे असू शकतात. तर, मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, या कारणांबद्दल जाणून घेऊया, जेणेकरून ही समस्या लवकरात लवकर दूर करता येईल.

व्हिटॅमिन बी -12 ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. केसांची वाढ आणि केसांचा रंग नियंत्रित करण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 विशेष भूमिका बजावते. जेव्हा शरीरात त्याचे प्रमाण कमी होते, तेव्हा केस पांढरे होण्यासोबतच केसही कमकुवत होऊ लागतात.

अनुवांशिक

केस लवकर पांढरे होण्याचे एक कारण आनुवंशिकता देखील असू शकते. म्हणजेच, जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला लहानपणापासून किंवा तरुण वयात केस पांढरे होण्याचा इतिहास असेल. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी इलाज करणे तुम्हाला शक्य होणार नाही. कारण ही समस्या तुमच्या जीन्सशी संबंधित आहे.

वैद्यकीय परिस्थिती

काही वैद्यकीय परिस्थितीमुळे केस लवकर पांढरे होऊ शकतात. यामध्ये ऑटोइम्यून स्किन कंडिशन अॅलोपेसिया एरियाटा रोग देखील समाविष्ट आहे. यामुळे केवळ डोक्यावरच नाही तर शरीराच्या इतर भागांवरचेही केस गळू लागतात. केस पुन्हा वाढतात तेव्हा मेलेनिनच्या कमतरतेमुळे अकाली पांढरे केस तयार होतात.

धुम्रपान

धूम्रपानाच्या सवयीमुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. या संदर्भात केलेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या अडीच पटीने जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

'दादा फक्त तुमच्यामुळं शक्य झालं...' गृहप्रवेशानंतर सुरजने मानले अजित पवारांचे आभार, दादांनी कमेंट्स करत दिल्या हटके शुभेच्छा

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, अटकेनंतर होता तुरुंगात, सध्या जामीनावर बाहेर

SCROLL FOR NEXT