food esakal
लाइफस्टाइल

Food Safety Tips: उन्हाळ्यात शिजवलेले अन्न लवकर खराब होते? हे टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

पाऊस आणि थंड वातावरण पावसाळ्यात मूड रिफ्रेश करतात.

Aishwarya Musale

पाऊस आणि थंड वातावरण पावसाळ्यात मूड रिफ्रेश करतात. हा पावसाळा जितका आनंददायी आहे तितकाच तो सोबत त्रासही घेऊन येतो. या हंगामात अन्न साठवणे थोडे कठीण काम होते. स्नॅक्स आणि कुकीजसह सर्व गोष्टी खराब होण्याचा धोका जास्त असतो.

पावसाळ्यात ओलसरपणा आणि ओलावा जास्त असतो, त्यामुळे जेवणाची खरी चवही बिघडते. इतकेच नाही तर बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे असे अन्न खाल्ल्याने आजार होण्याचा धोकाही असतो.या पावसाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचवायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो, यामुळे तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय या ऋतूचा आनंद घेऊ शकाल.

काचेचे भांडे वापरा

पावसाळ्यात फराळाचे पदार्थ आणि इतर गोष्टी जास्त वेळ पॅकेटसोबत ठेवणे थोडे कठीण जाते. ओलसरपणामुळे पॅकेट लवकर खराब होतात. या गोष्टी जतन करण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करा. अशा वस्तू फक्त एअर टाईट जारमध्ये साठवा, ज्यामुळे त्यांची शेल्फ लाइफ देखील वाढेल. याशिवाय, तुम्ही झिप लॉक बॅग देखील वापरू शकता.

ओलसर ठिकाणी साठवू नका

बर्‍याच वेळा आपण अन्न अशा ठिकाणी ठेवतो, जिथे आधीच ओलावा किंवा ओलसरपणा असतो. ही अशी जागा आहे जिथे बहुतेक जीवाणू वाढतात. त्यामुळे अन्न साठवण्याआधी अशी ठिकाणे ओळखा किंवा कोणताही खाद्यपदार्थ व्यवस्थित सुकल्यानंतरच येथे ठेवा.

फ्रेशनेसची काळजी घ्या

फळे आणि भाज्या खरेदी करण्यापूर्वी, त्यांच्या ताजेपणाची काळजी घ्या. बऱ्याच काळापासून साठवलेल्या वस्तू खरेदी करणे टाळा. तसेच, भाज्या ताजे ठेवणाऱ्या पुरवठादारांकडूनच खरेदी करा.

दुग्धजन्य पदार्थ असे करा स्टोर

फ्रिजमध्ये दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी, त्याचे तापमान 0 ते 5 अंशांवर सेट करा. यामुळे जिवाणूंची वाढ होणार नाही आणि ते दीर्घकाळ ताजे राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT