hair care sakal
लाइफस्टाइल

Monsoon hair care tips : पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी! 'या' सोप्या टिप्स ठेवा लक्षात

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी आम्ही येथे काही टिप्स शेअर करत आहोत.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा हा सर्वांचा आवडता ऋतू असतो. पावसात भिजायला आणि मज्जा मस्ती करायला प्रत्येकालाच आवडते. अनेकदा लोक पावसाळ्यात केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. कोंडा ही देखील या ऋतूतील सामान्य समस्या आहे. पावसात भिजल्यामुळे स्कॅल्पमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचाही धोका असतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी आम्ही येथे काही टिप्स शेअर करत आहोत.

पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

पावसाच्या पाण्यापासून केसांचे संरक्षण करा

पावसाळ्यात तुमचे केस पावसात भिजण्यापासून वाचवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पावसात भिजले असाल तर तुमचे केस पूर्णपणे कोरडे करा. सॉफ्ट मायक्रोफायबर टॉवेल वापरा जे पाणी लवकर शोषून घेते, यामुळे केस तुटण्याचा धोका देखील कमी होतो.

खोबरेल तेल

शॅम्पूच्या 15 मिनिटे आधी खोबरेल तेल लावल्याने तुमचे केस प्री-कंडिशनिंग होण्यास मदत होते. केसांना आठवड्यातून किमान दोन वेळा तेल लावा. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल. मालिश केल्याने केस कोरडे होण्याच्या समस्येपासून सुटका होईल.

निरोगी आहार

आपले केस निरोगी ठेवण्यासाठी पावसाळ्यात पौष्टिक आहार घेणेही गरजेचे आहे. तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांसह अंडी, अक्रोड, दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रथिनेयुक्त पदार्थ तुमच्या केसांना चमक आणतात. यासोबतच जांभूळ, नट्स, पालक आणि बीटरूट हे पदार्थ केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट आहेत.

योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा

पावसाळ्यात आपले केस कोरडे होतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या केसांनुसार योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा. शॅम्पू केल्यानंतर, कंडिशनर लावा आणि ओल्या केसांवर चांगले हेअर सीरम वापरा.

हेअरस्टाईलची काळजी घ्या

बाहेर जाताना, केस ओले होऊ नयेत म्हणून नेहमी पोनीटेल बांधा. हे केस गळण्यास प्रतिबंध करेल आणि बॅक्टेरियापासून वाचवेल.

ओले केस बांधू नका

केस भिजले असल्यास लगेच बांधू नयेत. यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते. केस भिजले असेल तर लगेच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT