White Hair Problem  Sakal
लाइफस्टाइल

White Hair Remedies : केस काळे करण्यासाठी नारळाच्या तेलात मिक्स करा 'या' बिया, पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर

White Hair Problem : जर आपणही पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर एक रामबाण उपाय करून केस काळे करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

White Hair News : वय वाढत असल्याच्या कारणामुळे किंवा बहुतांश जण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. पांढरे केस काळे करण्यासाठी कित्येक जण केमिकलयुक्त ट्रीटमेंट करतात. पण यामुळे केसांचे नुकसानच अधिक होते. केमिकलयुक्त हेअर डाय लावल्याने केसांचा पोत बिघडतो. 

यामुळे केसांशी संबंधित अन्य समस्याही निर्माण होतात. हे धोके टाळायचे असतील तर पांढरे केस काळे करण्याकरिता आपण काही घरगुती उपचार करू शकता. यामुळे केसांना नैसर्गिक स्वरुपात काळा रंगही मिळेल शिवाय केस घनदाट, मऊ आणि मजबूत होतात. 

तर केस काळे करण्यासाठी कलोंजीचा (Kalonji Seeds Benefits) वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…  

केस काळे करण्याकरिता कलोंजीचा वापर कसा करावा( how to use  Kalonji For White Hair)

कलोंजीच्या काळ्या रंगाच्या छोट्या आकाराच्या बिया असतात,  या बियांचा आहारामध्येही वापर केला जातो. कलोंजीचे कित्येक आरोग्यवर्धक फायदे आहेतच शिवाय या बियांचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास केसांनाही भरपूर फायदे मिळतील. 

कलोंजीमध्ये फॅटी अॅसिड्सचा समावेश असतो, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.  यामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्मही असतात, ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.

पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका करून घ्यायची असल्यास नारळाचे तेल (Coconut Oil Benefits for Hair) आणि कलोंजीच्या बिया एकत्रित करून तेल तयार करून घ्या. कलोंजीच्या तेलाचा वापर केल्यास पांढऱ्या केसांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

कसे तयार करावे तेल ?

तेल तयार करण्यासाठी नारळाच्या तेलामध्ये कलोंजीच्या बिया मिक्स करा. पाच ते १० मिनिटे तेल गरम करावे. यानंतर तेल थंड करून गाळून एका बाटलीत भरावे. रात्री झोपण्यापूर्वी केस, स्कॅल्पवर तसंच केसांच्या मुळांनाही तेल लावावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. काही सलग आठवडे या तेलाचा वापर केल्यास केस काळेभोर व घनदाट होऊ शकतात. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT