Neem Leaves sakal
लाइफस्टाइल

Neem Leaves Uses: या घरगुती कामांसाठी कडुलिंबाच्या पानांचा करा वापर, जाणून घ्या

कडुलिंबाचा उपयोग अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो.

Aishwarya Musale

Healthcare Tips : कडुलिंबाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर आहे. पूर्वीच्या काळी कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ केले जात. कडुलिंबाची पाने त्वचेसाठी देखील वापरली जातात. कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेले प्रोडक्ट्सही बाजारात उपलब्ध असतील.

तुम्हाला माहीत आहे का की कडुलिंबाची पाने शरीराशी संबंधित समस्यांशी लढण्यासाठी तर मदत करतातच पण तुम्ही घरातील अनेक कामांसाठीही कडुलिंबाची पाने वापरू शकता? तुमचा आमच्यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

कीटकांसाठी कडुलिंबाची पाने

पावसाळ्यात घरात किड्यांची पैदास होते. हे किडे चावल्यास समस्या उद्भवू शकते. कीटक घरातून पळवून लावण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले केमिकल स्प्रे वापरता का? तर यावेळी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून ते दूर करा. कडुलिंबाच्या पानांपासून तुम्ही स्प्रे बनवू शकता.

बाथरूममधील दुर्गंधी दूर करा

बाथरूममधून खूप वास येतो. वास न येण्यासाठी तुम्ही महागडे स्प्रे वापरत असाल, पण काही काळानंतर त्यांचा प्रभाव कमी होतो. बाजारात मिळणाऱ्या फ्रेशनरऐवजी तुम्ही कडुलिंबाची पाने वापरू शकता.

कडुलिंबाची पाने कपाटात का ठेवावीत

कपाटात कपडे ठेवले जातात. ओलाव्यामुळे कपड्यांवर डाग पडतात. कपाटात जास्त वेळ कपडे ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागते.

कपड्यांमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून नेफ्थलीन बॉल्सचा वापर केला जातो. जर तुमच्याकडे हे बॉल्स नसतील तर तुम्ही काय कराल? अशा परिस्थितीत कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरू शकतात.

चेहऱ्यावर कडुलिंब कसा लावायचा

त्वचेची काळजी न घेतल्याने त्वचा निस्तेज होऊ लागते. त्वचेवर पिंपल्स येतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेवर योग्य गोष्टींचा वापर करणे आवश्यक आहे.

त्वचेवर खाज येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये अॅलर्जीपासून ते सनबर्नपर्यंतच्या समस्यांचा समावेश होतो.

जर तुमच्या शरीराला खाज येत असेल तर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरू शकतात. आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून या पाण्याने आंघोळ केल्याने खाज येण्याची समस्या कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

Gangapur Court Verdict : शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सिरजगाव येथील तिघांना न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Latest Marathi News Live Update: टिंगरे नगर रोडवरील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

SCROLL FOR NEXT