Hrithik Roshan Fitness  esakal
लाइफस्टाइल

Hrithik Roshan Fitness : हृतिकसारखी बॉडी हवीय तर त्याच्यासारखे डायट अन् वर्कआउटही करायला हवं, जाणून घ्या त्याचे फिटनेस सिक्रेट

पहिल्या चित्रपटापासून आजवर हृतिक अधिकच हॅंडसम अन् फिट बनला आहे

Pooja Karande-Kadam

Hrithik Roshan Fitness :

अनेक तरूणांना असं वाटतं की आपली बॉडी पण सलमान , शाहरूख, ह्रतिक सारखी व्हायला हवीय. पण, ती तरूण मुलं बॉडी चांगलं बनवण्याचे केवळ स्वप्नच पाहतात. स्टार्ससारखी मेहनत त्यांना घेता येत नाही. अशा फिटनेससाठी नक्की काय करायचं हेही त्यांना माहिती नसतं.

हृतिक रोशनचेच घ्या तो फिटनेस राखण्यासाठी, परफेक्ट बॉडी लुकसाठी काय करतो हे लोकांना माहिती नाही. आज हृतिकचा वाढदिवस आहे तो ५० वर्षांचा झाला आहे. पण आजही त्याच्यासारखा फिट अभिनेता कोणीच नाही. आज आपण त्याचेच बॉडी सिक्रेट जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन जेव्हाही चित्रपटात दिसतो तेव्हा लोकांना वेड लावतो. त्याचा पहिलाच चित्रपट ‘कहो ना प्यार है’ तरूणांना आजही भुरळ घालतो. त्या चित्रपटात पाहिलेला हृतिक अन् आत्ताचा हृतिक यांच्यात फारसा फरक नाही. इतकी वर्ष लोटली तरी देखील तो आहे असाच आहे. (Fitness)

बहुतेक मुलांचे स्वप्न असते की त्यांचेही शरीर चांगले आहे. पण तुमच्या आहार आणि खाण्याच्या सवयींमुळे हे शक्य होत नाही. अभिनेता हृतिक रोशनसारखे शरीर असावे अशी मुलांची इच्छा असते.

वर्कआउट

हृतिक रोशनच्या मसल्स, बॉडी आणि ऍब्सचे रहस्य म्हणजे त्याचा वर्कआउट. त्याच्या वर्कआउट रूटीनमुळेच तो पूर्णपणे फिट राहतो. हृतिक त्याच्या तब्येतीबाबत खूप जागरूक आहे. हृतिकला हेवी वेटलिफ्टिंग करायला आवडते. पण वर्कआउट सुरू करण्यापूर्वी तो वॉर्म अप करायला विसरत नाही. धावणे आणि नृत्य करणे हाही अभिनेता त्याच्या फिटनेसचा महत्त्वाचा भाग मानतो.

हृतिकचे डायट

अभिनेता आपल्या आहारात हिरव्या भाज्या खाण्यास प्राधान्य देतो. हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. फास्टफूड वैगरे पदार्थांमुळे पोटात उगीचच गर्दी होते अन् त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होते. हृतिक रोशन त्याच्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन शेक, चार अंड्याचा पांढरा बलक, सोबत एका ब्राउन ब्रेडसोबत मल्टीविटामिन घेतो.

यासोबतच हृतिकला ग्रीक गॉड, 50 ते 60 ग्रॅम चिकन ब्रेस्ट खायला आवडते. त्याला ब्रोकोली खूप आवडते. रात्रीच्या जेवणासाठी, हृतिक चिकन, सोबत वाफवलेल्या किंवा कमी तेलात फ्राय केलेल्या भाज्या खातो.

हृतिक कोणकोणते व्यायाम करतो?

हृतिक रोशनच्या व्यायाम योजनेत कार्डिओ, सर्किट ट्रेनिंग आणि हाताचे व्यायाम यांचा समावेश आहे. तसेच, तो आठवड्यातून फक्त 4 ते 5 दिवस व्यायाम करतो. त्यांच्या रूटीननुसार व्यायाम ठरलेले असतात. तुम्हालाही हृतिकसारखी बॉडी मिळवायची असेल, तर आजपासूनच हा डाएट आणि वर्कआउट सुरू करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT