HSC Result 2024  esakal
लाइफस्टाइल

HSC Result 2024 : मार्क कमी पडले म्हणून मुलं नाराज आहेत, पालकांच्या या गोष्टी मुलांना डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचवतील

मुलांशी इतर मुलांशी तुलना करू नका, मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या

सकाळ डिजिटल टीम

HSC Result 2024 : 

HSC १२ वी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्यातील अनेक नेट सेंटर्सवर मुलांसह पालकांनीही गर्दी केल्याची पहायला मिळाली. मुलांच्या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी आणि १२ बोर्डाचे निकाल महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच त्यांना इतके महत्त्व आहे.

१२ वी बोर्ड परीक्षेत मनासारखे मार्क मिळाले नसतील तर मुलं नाराज होतात. मुलांनी वर्षभर अभ्यास केलेला असतो. पण इतकं करूनही चांगले मार्क पडले नाहीत तर मुलं नाराज होतात. अनेक पालक त्यांच्यावर रागवतात, चिडचिड करतात. (HSC Board Exam)

पण खरं तर याच क्षणाला मुलांशी आपुलकीने बोलण्याची जास्त गरज असते. कारण, मार्क कमी पडले त्यामुळे मुलं टोकाचे पाऊल उचलू शकतात. काही मुले डिप्रेशनला बळी पडू शकतात. त्यामुळेच पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळायची याबद्दल आपण जाणून घेऊयात.

मार्क कमी पडले तर बाबा रागवतील, पाहुणे काय म्हणतील, आईची मार्कांची अपेक्षा आपण पूर्ण केली नाही,असे अनेक विचार मुलांच्या मनात येत असतात. तसेच, मित्रांना जास्त मार्क पडले तर कॉलनी, बिल्डींगमधील इतर लोक चर्चा करतील हे विचारही ते करतात.

पण तुम्ही तुमच्या मुलांना पटवून द्या, की लोक काय म्हणतील यामुळे आम्हाला फरक पडत नाही. जितके मार्क आहेत त्यात आम्ही समाधानी आहोत असे मुलांना सांगा. तर त्यांच्या मनावरील दडपण थोडेसे कमी होईल.

मुलांशी प्रेमाने बोला

मार्क कमी पडले तर बाबा रागवेल या भितीने मुलांच्या पोटात गोळा यायला लागतो. कारण, पुढील शिक्षणासाठी अपेक्षित असलेले मार्क्स पडणार नाहीत. त्यामुळे मुलांना टेन्शन आलेलं असतं, तेव्हा मुलांशी प्रेमाने बोला. तुमची प्रेमाची दोन वाक्यही मुलांना डिप्रेशनमधून बाहेर काढू शकतील.

इतर मुलांशी तुलना करू नका

मुलांच्या ग्रूपमधील इतर मुलांना किती मार्क पडले, त्याला इतके जास्त मार्क पडले आणि तूला कमी कसे असा प्रश्न, चर्चा मुलांसोबत करू नका. यामुळे मुलांना असे वाटेल की तुम्ही त्यांची इतर मुलांशी तुलना करत आहात. ज्याचा परिणाम त्यांच्या मनावर होईल.

या गोष्टींबद्दल बोलू नका

जरी तुमच्या मुलाचे निकाल तुमच्या किंवा मुलाच्या अपेक्षेनुसार आला नसला तरी, उपदेशाचे डोस मुलांना देत बसू नका. तू अजून मेहनत करायला हवी होतीस, तूला जमलं नाही. अजून अभ्यास केला असतास तर, या अशा गोष्टींची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे मुलांनी काय करायला हवं होतं हे सांगणं बंद करा.

मुलांसोबत रहा

निकाल लागल्यानंतर पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे. तणाव दूर करण्यासाठी, तो मुलासोबत गेम किंवा चित्रपट देखील पाहू शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर मुलाच्या वर्तनातील बदल लक्षात घ्या. परिणामांबद्दल मुलाशी शांतपणे बोला.

पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलांवर वाईट परिणाम होतो आणि ते चुकीचे पाऊल उचलू शकतात. म्हणून, मुलाला शक्य तितके मार्कांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा.

मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या

जर तुम्ही सर्व काही करून पाहिले असेल पण तुमच्या मुलाला अजूनही असे वाटत असेल की तो किंवा ती समाजात मिसळू शकत नाही. तो किंवा ती ज्या गोष्टींचा आनंद घेत असे त्या आता नाहीत. तो किंवा ती मित्रांपासून देखील दूरावतात. त्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने घ्या. ही नैराश्याची लक्षणे असू शकतात. लवकरच मानसोपचार तज्ज्ञांना भेटा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT