oranges  sakal
लाइफस्टाइल

Benefits of Orange: उन्हाळ्यात संत्री खायचे अनेक फायदे! तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या

संत्री खायला चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते.

Aishwarya Musale

संत्री खायला चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. या फळामध्ये व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. या फळाचे सेवन प्रत्येक ऋतूत केले जात असले तरी उन्हाळ्यात हे फळ खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.

1. हृदय निरोगी ठेवते

संत्र्यामध्ये पोटॅशियम आणि फायबर असते. जे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि इतर जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज संत्र्याचे सेवन करावे.

2. रक्त वाढते

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. हे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर देखील नियंत्रित करते. यासोबतच हाडे मजबूत करण्याचे काम करतात.

3. त्वचेसाठी फायदेशीर

संत्रा तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. म्हणूनच हिवाळ्यात संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो.

4. कर्करोगाचा धोका कमी होतो

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. या फळामध्ये एस्कॉर्बिक अॅसिड आणि बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे शरीरातील कर्करोगाचा धोका कमी होतो.

5. वजन कमी

संत्र्यात कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

संत्र्याची साल देखील फायदेशीर आहे

1. संत्र्याच्या सालीमध्ये सुपर-फ्लेव्होनॉइड असते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. यासोबतच रक्तप्रवाहादरम्यान रक्तवाहिन्यांवर जास्त दाब पडू देत नाही. किसलेले संत्र्याची साल भाज्यांच्या सूपमध्ये घालता येते. याशिवाय ज्यूस बनवूनही पिऊ शकता.

2. याशिवाय संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा. यानंतर फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची निखारता वाढेल. यासोबतच डागही निघून जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT