If you have acne problems on your face make a face pack of Peruvian leaves kolhapur news 
लाइफस्टाइल

चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असल्यास बनवा पेरूच्या पानांचा फेसपॅक

अर्चना बनगे

कोल्हापूर : अनेकवेळा आपल्या चुकांमुळे आपल्या त्वचेच्या समस्या उदभवत असतात. जास्त प्रमाणात केमीकल वापरणे. त्वचेसाला सूट न होणारी ओेषधांचा अतिवापर, यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. परंतु, जास्त घाबरण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे तुच्या त्वचेच्या समस्यांच्या तक्रारी दूर होणार आहेत. 

आपर्यंत तुम्ही फक्त पेरू खाल्लाच असेल परंतु, त्याचे इरही खूप फायदे आहेत. पेरूच्या पानांपासून बनविलेल्या फेसपॅकपासून चेहऱ्यावरील त्वचेच्या समस्या दूह होण्यास मदत होते. जर तुमचा चेहरा तेलकट असेल, चेहऱ्यावर मुरुम, डाग अशा विविध समस्यांवर पेरूच्या पानापासून बनविलेले फेसपॅप फायदेशीर आहे. 

पेरूमध्ये जेसे आयुर्वेदिक गुण असतात तसेच गुण पेरूच्या पानातही असतात. पेरुच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि फोलिकॲसिडसारखे सूक्ष्म पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी पेरूची पाने महत्वाची आहेत.

नुकतेच आयुर्वेदिक डॉक्टर प्रिया बहुउलियन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पेरूच्या पानांपासून बनलेल्या फेसपॅकविषयी पोस्ट शेअर केली आहे आणि त्यासंदर्भात एक रेसिपीही दिली आहे. डाॅ. प्रिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरूच्या पानांमध्ये गॅलिक ॲसिड, एस्कॉर्बिक ॲसिड, कॅरोटीनोईड्स सारखे घटक आहेत. ज्यामुळे त्वचेचा संसर्ग आणि जळजळ बरे होऊ शकते. 

असा बनवा पेरूच्या पानापासून फेसपॅक

कोवळ्या पेरूची पाने आणि थोडे पाणी घ्या. या दोन्हीला एकत्र करून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या. 
 
फेसपॅक कसा वापराल

सर्व प्रथम तुमचा चेहरा कोमट पाण्याने आणि सौम्य क्लीन्सरने धुवा किंवा ५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर स्टीम देखील लावू शकता. जेणेकरून चेहऱ्यावरीस छिद्र खुले होतील आणि फेस पॅकचा चांगला परिणाम होईल. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट ताजीच असावी म्हणजे फ्रिजमध्ये ठेवलेली नको. ही पेस्ट चेहऱ्यावर सुकत नाही तोपर्यंत लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याने ती धुवा.

त्वचा संवेदनशील असेल तर हे करा

तुमची त्वचा संवेदनशील असेल तर सुरुवातीला पॅच टेस्ट करू शकता. जर त्वचेवर काही परिणाम झाला तर ही पेस्ट वापरू नका. शक्य असल्यास या पेस्टमध्ये थोडे दही पण मिसळू शकता. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करा. ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक आहे. परंतु प्रत्येकाच्या त्वचेची रचना वेगळी असते आणि त्वचेवर घरगुती उपचारांचा परिणाम देखील भिन्न आहे. तुम्हाला त्वचेची एखादी समस्या असल्यास किंवा एखाद्या गोष्टीवर उपचार सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ही पद्धत वापरुन पहा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT