improved sex life due changing in to vegan diet british journalist shared experience  
लाइफस्टाइल

शाकाहारामुळे सेक्सवर काय परिणाम झाला?, महिला पत्रकाराने सांगितला अनुभव

शाकाहाराच्या फायद्यांबाबत जगभरात अनेक संशोधने केली जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या जगभरातील लोकांमध्ये शाकाहाराविषयी जागरूकता वाढत असून लोक मांसाहार सोडून मोठ्या प्रमाणात शाकाहाराकडे (Vegetarian Diet) वळत आहेत. शाकाहाराच्या फायद्यांबाबत जगभरात अनेक ठिकाणी संशोधन देखील केली जात आहेत. दरम्यान 'द सन' या ब्रिटीश वृत्तपत्राच्या पत्रकार जॉर्जेट काली यांनी शाकाहाराबाबतचा त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हापासून त्यांनी व्हेगन आहार (Vegan Diet) घेणे सुरू केले तेव्हापासून त्यांचे लैंगिक जीवन अधिक चांगले झाले आहे. याबाबतची सविस्तर पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

जॉर्जेट कालीने सांगितले की, एका दिवशी मांस खाल्ले आणि तिच्या प्रियकरासोबत झोपायला गेली, पण अंथरुणावर जाताच त्यांना झोप लागली. त्यांच्या सोबत असे अनेकवेळा होत असे. यानंतर मात्र तिने मांसाहार पूर्णपणे सोडून दिला आणि ती पूर्णपणे शाकाहारी बनली. तिने सांगितले की, 'गेल्या सहा महिन्यांपासून मी शाकाहारी आहे. शाकाहारामुळे माझ्या कंबरेची जाडी देखील सुधारली आहे. माझी एनर्जी लेव्हल तसेच माझी सेक्सची इच्छा वाढली आहे.

आता आम्ही बेडवर दीर्घकाळ एकमेकांवर प्रेम करु शकतोय. माझ्या जोडीदारानेही शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, आता तो माझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हे फक्त तिचे मत नाही तर त्यामागे एक शास्त्र आहे. मुख्यतः शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे सेक्सची इच्छाही वाढत असल्याचे शेअर केलेल्या अनुभवात नमुद करण्यात आले आहे.

पालेभाज्या, अंजीर, भोपळ्याच्या बिया, लाल मिरची, डार्क चॉकलेट आणि बदाम या सर्वांमध्ये ब जीवनसत्त्वे आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. हे टेस्टोस्टेरॉन (सेक्स हार्मोन) पातळी आणि लैंगिक इच्छा वाढवतात. त्यांच्या सेवनाने सेक्सची इच्छा वाढते. मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये हाय कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड अॅनिमल फॅट असते, ज्यामुळे आपल्या धमन्या बंद होतात. यामुळे आपल्या शरीराच्या खालच्या भागात रक्ताचा प्रवाह मंदावतो, ज्यामुळे पुरुषांमध्ये नपुंसकता वाढते.

जॉर्जेट काली यांनी पुढे सांगितले की, जर तुम्हाला लवकर आणि चांगले परिणाम हवे असतील तर व्यायामासोबतच फ्लेव्होनॉइड्स युक्त आहार घ्या. यासाठी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि सफरचंद या फळांचा आहारात समावेश करा.

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, फ्लेव्होनॉइड्स युक्त आहार (Diet) पुरुषांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका कमी करू शकतो.

संशोधनात असे दिसून आले आहे की, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केल्याने आपल्या शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढू शकते. हे हार्मोन आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे आपण आपल्या प्रियजनांवर प्रेम करू शकतो.

सेक्स आणि सेंट यांचे जुने नाते आहे. एका संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक शाकाहारी अन्न खातात त्यांच्या शरीराचा गंध चांगला असतो आणि ते मांसाहार करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आकर्षक असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

Bidkin Accident : अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीचा अपघात; एक तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

Gas Leakage : बोईसर तारापूरमध्ये वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT